नवरात्रोत्सवानिमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार येथे आयोजित सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील दुर्गाकुंड, संकठा देवीचे मंदिर, नटवाच्या नटकेश्‍वरी मंदिर आणि कानपूर येथील संकटमोचन धाम मंदिर या ठिकाणी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या समवेतच बिहारमधील मुझफ्फरपूर येथील गोला रोडवरील दुर्गा स्थान, सोनपूर येथील रजिस्ट्री बाजार, दुर्गा मंदिराचे मैदान, पाटलीपुत्र येथील अशोक नगर, समस्तीपूर येथील शिव काली दुर्गा मंदिर या ठिकाणी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनांना अनेक जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी वर्षानुवर्षे सनातन संस्थेचे ग्रंथ, पंचांग, सात्त्विक उत्पादने मिळण्यासाठी वाट पहाणारे जिज्ञासू भेटले. काहींनी ‘सनातन संस्थेचे ग्रंथ अद्वितीय असून अशी माहिती कुठेच वाचायला मिळालेली नाही’, असे सांगितले.

क्षणचित्र

एक ७० वर्षीय वृद्ध व्यक्ती सायकलने ग्रंथप्रदर्शनावर आली. त्यांना ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ हे विषय आवडले. त्यांनी धर्मांतराविषयीचा ग्रंथ खरेदी केला. ते म्हणाले, ‘‘या ग्रंथांमध्ये अतिशय परिपूर्ण माहिती आहे. आज हा ग्रंथ घरोघरी असणे आवश्यक आहे.’’

 

सनातन संस्थेचे ग्रंथ, सनातन प्रभात आणि सनातन पंचांग यांचे अद्वितीयत्व दर्शवणारे प्रसंग !

१. सनातन संस्थेचे ग्रंथ खरेदी करण्यासाठी एक जिज्ञासू १५० किलोमीटर प्रवास करून प्रदर्शनस्थळी येणे

एक जिज्ञासू मागील दीड वर्षापासून सनातन संस्थेचे ग्रंथ शोधत होेते. त्यांना संकठामाता मंदिरामध्ये सनातन संस्थेचे प्रदर्शन असल्याचे समजले. त्यानंतर ते त्वरीत वाराणसी येथून १५० किलोमीटर लांब प्रवास करून केवळ ग्रंथ घेण्यासाठी संकठामातेच्या देवळात आले. त्यांनी १३ मोठे आणि १२ लघु ग्रंथ खरेदी केले. ते म्हणाले, ‘‘दीड वर्षापूर्वी वृंदावन येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनावरून ७-८ ग्रंथ खरेदी केले होते. तेव्हापासून मी संस्थेचे प्रदर्शन शोधत होतो. माझ्याकडे वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळ्या विषयांवरील अनेक ग्रंथ आहेत; परंतु तुमच्या ग्रंथांसारखी विशेषता कशातच नाही.’’

२. सनातन संस्थेचे ग्रंथ अद्वितीय आहेत ! – नरेंद्र पांडे, जिज्ञासू

श्री. नरेंद्र पांडे यांनी २ वर्षांपूर्वी सनातन संस्थेचे ग्रंथ खरेदी केले होते. तेव्हापासून ते संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन शोधत होते. नवरात्रीला संस्थेचे प्रदर्शन लागलेले पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी त्वरीत काही ग्रंथ खरेदी केले. ते म्हणाले, ‘‘या ग्रंथांतील माहिती बहुमूल्य आहे. असे ग्रंथ मी कुठेच पाहिले नाही.’’

३. ‘सनातन प्रभात’चा वर्गणीदार झाल्याचा मला अभिमान वाटतो ! – एक जिज्ञासू, गोरखपूर

प्रदर्शनावर गोरखपूर येथील एक जिज्ञासू आले होते. त्यांनी सनातन संस्थेचे कार्य जाणून घेतले. ते ‘सनातन प्रभात’ पाक्षिकाचे वर्गणीदार झाले. ते म्हणाले, ‘‘मी सनातन प्रभात’चा वर्गणीदार झाल्याचा मला अभिमान वाटतो. सनातन संस्था लोकांमध्ये हिंदुत्व जागृत करण्याचे कार्य करते आणि तिला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची तळमळ आहे. हे मला अतिशय आवडले.’’

४. आम्ही तुमचे प्रदर्शन आणि सनातन पंचांग यांची वर्षभर वाट पाहत असतो – एक जिज्ञासू,

एक व्यक्ती मागील ४-५ वर्षांपासून ‘सनातन पंचांग’ शोधत होती, तसेच एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही तुमचे प्रदर्शन आणि सनातन पंचांग यांची वर्षभर वाट पाहत असतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment