सैदपूर (वाराणसी) येथे सनातन संस्थेचे एक दिवसीय साधना शिबिर

शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना १ सौ. प्राची जुवेकर आणि २ श्री. गुरुराज प्रभु

सैदपूर (वाराणसी) – सनातन संस्थेच्या वतीने येथील आर. जे. पी. विद्यालयामध्ये एक दिवसीय साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व शिबिरार्थींनी नियमितपणे साधना करण्याचा निर्धार केला.

या वेळी सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु आणि सौ. प्राची जुवेकर यांनी साधनेविषयी मार्गदर्शन केले. या शिबिराचा २३ जणांनी लाभ घेतला.

क्षणचित्र

श्री. शिवकुमार – सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मी नामजप चालू केला. नामजपामुळेच मला स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळाले. नोकरीच्या निवड प्रक्रियेच्या वेळी कोणतीही अडचण आली नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment