ईश्‍वराचे नाम घेऊन भक्ती वाढवायला हवी ! – आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

ठाणे जिल्ह्यात युवा साधना आणि कार्य परिचय शिबिर

ईश्‍वराचे नाम घेऊन भक्ती वाढवायला हवी ! – आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

ठाणे – ‘सत्ययुगात ज्ञानयोग, त्रेतायुगात ध्यानयोग, द्वापरयुगात यज्ञयागादी साधना होती आणि आता कलियुगात भक्तीयोगाची साधना आहे. त्यामुळे ईश्‍वराचे नाम घेऊन भक्ती वाढवायला हवी, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी येथे पार पडलेल्या युवा साधना आणि कार्य परिचय शिबिरात केले. या वेळी ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या युवकांनी सहभाग घेतला. सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी साधनेविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांशी संवाद साधून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित केले. सौ. धनश्री केळशीकर यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा उद्देश, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय करून दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment