सनातन संस्थेच्या वतीने नागपूर येथे साधनावृद्धी शिबिर

पू. पात्रीकरकाका मार्गदर्शन करतांना

नागपूर – येथे ३ ऑक्टोबर या दिवशी सनातन प्रभातचे वाचक, विज्ञापनदाते, अर्पणदाते, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी ‘साधनावृद्धी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. शिबिरात सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. अशोक पात्रीकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला सनातन प्रभातचे वाचक, जिज्ञासू, हितचिंतक, तसेच धापेवाडा आणि हुडकेश्‍वर येथील धर्मशिक्षण वर्गात येणारे धर्मप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

पू. अशोक पात्रीकर यांनी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ सरळ आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले. सनातन संस्थेच्या साधिका सौ. नम्रता शास्त्री यांनी मनाचे कार्य, साधना करतांना निर्माण होणारे मनाचे अडथळेे दूर करण्यासाठी नाम कसे साहाय्य करते आणि साधनेतील आनंद कसा अनभवू शकतो, याविषयी सांगितले. पू. पात्रीकरकाका यांनी स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व, स्वयंसूचना यांविषयी मार्गदर्शन केले. उपस्थित जिज्ञासूंनी प्रक्रिया राबवण्याचा निश्‍चय केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment