नंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप !

जळगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने सनातन संस्थेच्या संस्कार वह्यांचे आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सनातन संस्थेची संस्कार वही विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठी निश्चित प्रेरणा देत राहील, असा विश्वास या प्रसंगी श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केला.

खासदार जयसिद्धेश्वर यांनी आयोजित केलेल्या प्रवचनात सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन

शेळगी, सोलापूर येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर घेण्यात आलेल्या प्रवचनात सद्गुरू स्वाती खाडये यांनी मार्गदर्शन केले !

देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे !

उत्तरप्रदेशमधील मदरशांचे ‘डिजिटलायजेशन’ केल्यावर तेथे १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

व्यापारी श्री. सुरेश काबरा यांच्याशी झालेल्या संपर्कात त्यांनी सांगितले, ‘‘सनातन संस्था’ ही पुढील काळाची आवश्यकता आहे. ‘नाहीतर पुढील पिढीत हिंदू रहाणार नाहीत.’’ त्यांनी त्यांच्या कुटुबियांसाठी ग्रंथांची मागणी केली. ते आम्हाला म्हणाले, ‘‘मी विश्वस्त असलेल्या मानवत येथील एका मंदिरासाठी ग्रंथांची मागणी देतो‘‘.

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा आणि संकल्प यांमुळे वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे समाजातून ‘प्रसार अभियाना’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवतांना आम्हाला ‘हे एक दैवी अभियान आहे’, याची प्रचीती आली.

साधना हीच आनंदाची गुरुकिल्ली ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कलियुगामध्ये सर्वांत सोपी ‘नामसाधना’ सांगितली आहे. भौतिक सुखांमुळे केवळ क्षणिक सुख मिळते; मात्र साधना केल्याने चिरकाळ टिकणारा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे प्रत्येकाने आनंदी जीवन अनुभवण्यासाठी साधना करा.

मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्थेच्या वतीने घेतल्या जाणार्‍या बालसंस्कार वर्गांमुळे मुलांमध्ये झालेले पालट !

मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्थेच्या वतीने घेतल्या जाणा-या बालसंस्कार वर्गांमुळे मुलांमध्ये झालेले पालट या लेखात दिले आहेत.

साधना केल्यास प्रत्येक हिंदूचे कुटुंब आनंदी होईल ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अनेक हिंदूंच्या घरांमध्ये धर्माचरण होत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समस्यांवरील उपायांविषयी हिंदूंना कुठेही दिशा दिली जात नाही. याचा परिणाम हिंदूंच्या व्यावहारिक, कौटुंबिक आणि धार्मिक गोष्टींवर होत आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केल्यास त्याचे कुटुंब आनंदी होईल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्ष्मणपुरी (लखनऊ, उत्तरप्रदेश) येथील विविध शासकीय विभागांतून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘ऑक्टोबर २०२१ मध्ये आम्ही उत्तरप्रदेश या राज्यात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत जिज्ञासूंना भेट देणे चालू केले. उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनऊ) येथे आम्हाला आलेले अनुभव कृतज्ञतापूर्वक पुढे दिले आहेत.

पिंगळी खुर्द (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन पार पडले !

सातारा तालुक्यातील पिंगळी खुर्द या गावात सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. शोभा अशोक थोरात यांचे नातेवाईक श्री. पोपट सदाशिव थोरात यांच्या घरी वर्षश्राद्ध होते. त्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.