चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदूसंघटन मेळाव्यात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे मार्गदर्शन !

मेळाव्याला उपस्थित धर्मप्रेमी

जळगाव – चोपडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संस्कार मंडपम् सभागृहात ७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ‘हिंदूसंघटन मेळावा’ पार पडला. मेळाव्याला सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, सनातनच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि  हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले.

 

वक्फ बोर्डाच्या विरोधात जळगाव जिल्ह्यात सनदशीर मार्गाने
आंदोलन ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भूमी बळकवणे, खंडणी वसूल करणे, धर्मांतर करणे आदी षड्यंत्रे रचणार्‍या वक्फ बोर्डाच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा उभारणे ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी जळगाव येथे याविरोधात समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबरला भव्य आंदोलन उभारणार असून चोपडा येथे १० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे.

Leave a Comment