सनातन संस्थेच्या वतीने जळगाव येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !
ऋषिमुनींनी केलेले संशोधन आणि आरोग्याविषयीचे ज्ञान समाजाला कळावे, यासाठी येथे सनातन संस्थेच्या वतीने डॉ. दीपक जोशी यांनी बिंदूदाबन उपचार शिबिर घेतले.
ऋषिमुनींनी केलेले संशोधन आणि आरोग्याविषयीचे ज्ञान समाजाला कळावे, यासाठी येथे सनातन संस्थेच्या वतीने डॉ. दीपक जोशी यांनी बिंदूदाबन उपचार शिबिर घेतले.
शिबिरामध्ये सनातन संस्थेचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार असे विविध आजार असणाच्या ५६ साधक रुग्णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले.
श्रीरामजन्मभूमीवर 490 वर्षांच्या वनवासानंतर भव्य श्रीराममंदिर उभे रहात आहे. संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साहाचा संचार झाला आहे. अमेरिकेमध्ये हिंदूंकडून श्रीराममंदिरानिमित्त फेर्या काढण्यात येत आहेत. संपूर्ण भारत राममय झाला आहे. 22 जानेवारी जशी जवळ येत आहे, तशी भारतियांमध्ये रामभक्तीची ज्योत अधिक तेजस्वीपणे तेवू लागत आहे
सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच श्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.
सनातन संस्थे द्वारा आनंदी जीवनासाठी साधना या विषयावर जाहीर साधना प्रवचनाचे गोव्यात म्हपसा (6.01.2024) आणि वाळपई (7.01.2024) येथे आयोजन !
कोचि (केरळ) – येथील दत्त मंदिरात २६ डिसेंबर या दत्त जयंतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक जिज्ञासू आणि दत्तभक्त यांनी घेतला.
पुणे येथे विविध ठिकाणी लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच विविध प्रतिष्ठितांची भेट !
‘गीता जयंती’निमित्त २२ आणि २३ डिसेंबर या दिवशी फरिदाबादमध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ साजरा करण्यात आला.
