मुझफ्फरपूर (बिहार) येथे शिवजयंतीच्या उत्सवात सनातन संस्थेचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘विश्व सनातन सेने’चे तिरहुत विभागाचे श्री. अनिल कुमार यांनी शिवजयंती उत्सव आयोजित केला होता. या उत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. मनीषा मिश्रा यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. याचा लाभ १०० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला. यानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

Leave a Comment