इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रा’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार

इंदूर (मध्यप्रदेश) – प्रतिवर्षीप्रमाणे चालू वर्षीही येथील दशहरा मैदानावर ‘तरुण जत्रा’ या मराठी पदार्थ आणि संस्कृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्म, अध्यात्म, बालसंस्कार आदी विविध विषयांवरील ग्रंथ आणि सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला ‘तरुण जत्रा’चे संयोजक श्री. मिलींद महाजन यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी त्यांच्या समवेत भाजपचे नेते तथा माजी नगरसेवक श्री. सुधीर देगडे उपस्थित होते. या प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी राजेंद्रनगरचे नगरसेवक श्री. प्रशांत बडवे यांचे सहकार्य लाभले. श्रीराममंदिर उद्घाटनानंतर झालेल्या या मेळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीरामाविषयीचे कार्यक्रम दिसून आले.

Leave a Comment