
अहिल्यानगर – ‘येणार्या काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्ध होतीलच असे नाही’, असे विविध संतांनी सांगितले आहे. आपत्काळ कसा असू शकतो ? हे कोरोना महामारीच्या काळात बहुतेकांनी अनुभवले. पुढे यापेक्षाही भीषण आपत्काळ येऊ शकतो आणि तेव्हा आधुनिक वैद्य उपलब्ध होतीलच, असे नाही. अशा वेळी पुढील काळात उपचार मिळावे, यादृष्टीने बिंदूदाबन उपचार शिकणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. त्या काळात रुग्णांच्या वेदना न्यून करता येण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत वापरता यावी, यासाठी अहिल्याननगरमधील खंडेलवाल भवन येथे ३ दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये सनातन संस्थेचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार असे विविध आजार असणाच्या ५६ साधक रुग्णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले. उपचारानंतर रुग्णांनी बरे वाटल्याचे सांगितले.
उपाशीपोटी रुग्णांची तपासणी कशी करावी ? बिंदूदाबनाची तात्त्विक माहिती, हात-पाय यांवरील प्रत्येक बिंदूचे कार्य, मणक्याचा आजार बिंदूदाबनाद्वारे कसा न्यून करावा ? यांवर डॉ. जोशी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रात्यक्षिक आणि सरावही घेण्यात आला.
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !