सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या साजरे व्हावेत, यासाठी मुंबई येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिराचे आयोजन !

सार्वजनिक उत्सव आणि सण हे हिंदु धर्माचे अविभाज्य घटक आहेत. सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्सवांच्या अनुमतींपासून ते प्रत्यक्ष उत्सव साजरे करेपर्यंत अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते.

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी मंदिरांच्या स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आले.

पुणे येथे मंदिर स्वच्छता मोहिमेचे आयोजन

हिंदूंमध्ये मंदिराविषयी भावनिर्मिती व्हावी, देवतांविषयी कृतज्ञताभाव निर्माण व्हावा, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पुणे शहरातील विविध भागात सामूहिक मंदिर स्वच्छतेचे आयोजन करण्यात येत आहे.

‘तणावमुक्तीसाठी अध्यात्माची आवश्यकता’ यावर सनातन संस्थेचे मार्गदर्शन

शहाजीनगर (जिल्हा पुणे) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांना सनातनचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्माची आवश्यकता’ याविषयी अवगत केले.

शिरढोण येथील स्मशानभूमीत अंत्यविधींच्या संदर्भात धर्मशिक्षण देणार्‍या सनातन संस्थेच्या १८ प्रबोधनात्मक फ्लेक्सचे अनावरण

शिरढोण (रायगड) येथील महामार्गाजवळील स्मशानभूमीत सनातन संस्थेच्या वतीने अंत्यविधींच्या संदर्भात धर्मशिक्षण देणारे प्रबोधनात्मक १८ फ्लेक्स २७ मार्च या दिवशी लावण्यात आले.

कन्या पूजन आणि भोजन समारंभात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

अमरावती येथील संध्याकाळ दैनिक मंडल आणि दैनिक मातृभूमीचे संपादक अन् मालक श्री. अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी चैत्र नवरात्रामधील दुर्गाष्टमी या दिवशी २ सहस्र १०० कन्या पूजन आणि भोजन यांचा मानस करून समारंभ आयोजित केला होता

बोईसर (जिल्हा पालघर) येथे जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रमात सनातनचा सहभाग !

आज पालकच पाश्‍चिमात्त्य संस्कृतीकडे आकर्षित झाले आहेत. सात्त्विक पद्धतीने सण साजरे करायचे सोडून आपण पाश्‍चिमात्त्यांचे निरर्थक ‘डे’ साजरे करतो. पाश्‍चात्य देशातही खात नाहीत, असे पदार्थ आपण खातो.

सनातन संस्थेच्या वतीने पाली (जिल्हा रायगड) येथे महिलांच्या आरोग्य विषयक समस्या आणि महिला सबलीकरण या विषयांवर प्रवचन

मराठा समाज महिलाध्यक्षा, तसेच भाजपच्या तालुका अध्यक्ष सौ. नेहारिका शिर्के यांनी सनातनचे महिलांच्या आरोग्य विषयीच्या समस्या आणि महिला सबलीकरण या विषयांवर प्रवचन घेण्यासाठी सनातन संस्थेच्या साधिकांना निमंत्रित केले होते.

अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – सौ. राजश्री प्रभु, सनातन संस्था

आज देशाची स्थिती पहाता महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, त्यामुळे महिलांच्या मनात असुरक्षिततेचा भावना निर्माण होत चालाली आहे. त्यामुळे या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेविषयीच्या समस्या सोडवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवेदनाद्वारे मागणी

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन देण्यात आले.