राजस्थानमधील जैसलमेर आणि सोजत येथे ‘बालक-पालक परिचय सोहळ्या’चे आयोजन
जैसलमेर/सोजत (राजस्थान) – सनातन संस्थेने जैसलमेर आणि सोजत येथे बालसंस्कार वर्गातील मुले अन् त्यांचे पालक यांच्यासाठी ‘बालक-पालक परिचय सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले. जैसलमेर येथील कार्यक्रमात बालसंस्कार वर्गातील मुलांनी ‘बालसंस्कार वर्गात मिळालेल्या शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक पालट झाले आहेत’, असे मनोगत व्यक्त केले. या वेळी पालकांनीही मनोगत व्यक्त करतांना ‘बालसंस्कार वर्गात प्रवेश घेतल्यानंतर मुलांच्या स्वभावात, वागण्यात आणि विचारसरणीत उल्लेखनीय पालट झाले आहेत’, असे सांगितले. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची ‘ऑनलाईन’ वंदनीय उपस्थिती लाभली.
जैसलमेर येथील कार्यक्रमात श्री. किरण कबाडी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला, तर रिना भरडिया यांनी ‘मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यात पालकांची भूमिका आणि प्रयत्न’, यांविषयी मार्गदर्शन केले. सोजत येथे सनातनच्या सौ. अर्चना लढ्ढा यांनी ‘सुसंस्कृत मुलांचे संगोपन करण्यात पालकांची भूमिका’, याविषयी मार्गदर्शन केले.
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !