गंगामाहात्म्य(आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि उपासना यांसह)

पुण्यसलिला गंगा नदीची महती अदि्वतीय आहे ! भौगोलिकदृष्ट्या गंगा ही भारतवर्षाची हृदयरेखा आहे ! इतिहासाच्या दृष्टीतून प्राचीनतम कालापासून आधुनिक कालापर्यंत आणि गंगोत्रीपासून गंगासागरापर्यंत गंगेची कथा, म्हणजे हिंदु सभ्यता आणि संस्कृती यांची अमृतगाथा आहे. राष्ट्रीय दृष्टीने आचार-विचार, वेशभूषा, जीवनपद्धती आणि जाती भिन्न असणार्‍यांना एकत्र आणणारी गंगा हिंदुस्थानचे राष्ट्र-प्रतीकच आहे. धार्मिकदृष्ट्या इतिहासाच्या उषःकालापासून कोटी कोटी हिंदू भाविकांना मोक्ष प्रदान करणारी गंगा, हे विश्वातील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. आध्यात्मिक क्षेत्रात जे स्थान गीतेचे आहे, तेच स्थान धार्मिक क्षेत्रात गंगेचे आहे. या ग्रंथात प्रामुख्याने गंगेचे माहात्म्य वर्णिले आहे.

गंगा सर्वदेवमयी, सर्वतीर्थमयी, सरित्श्रेष्ठा आणि महानदी, तर आहेच; पण ‘सर्वपातकनाशिनी’ ही तिची प्रमुख ओळख आहे. जगन्नाथ पंडित गंगेला प्रार्थना करतांना म्हणतात, ‘जलं ते जम्बालं मम जननजालं जरयतु ।’ अर्थात्


गंगामाते ! शेवाळे आणि चिखल असलेले तुझे पाणी माझे पाप दूर करो. (गङ्गालहरी, श्लोक २०)’ प्रत्येक हिंदू उभ्या आयुष्यात एकदा तरी पतितपावन गंगेत स्नान करण्याची अभिलाषा धरतो. हिंदु धर्माने ‘गंगास्नाना’ला एक धार्मिक विधी मानले आहे. हा विधी सुलभपणे करता यावा, यासाठी या ग्रंथात ‘गंगास्नानविधी’ आणि ‘गंगापूजनविधी’ सविस्तररित्या दिले आहेत.

गंगा नदीचे काठ ही तीर्थक्षेत्रे बनली असून ती हिंदूंसाठी अतीवंदनीय आणि उपासनेसाठी पवित्र अशी सिद्धीक्षेत्रेच आहेत. त्यांचे माहात्म्यही या ग्रंथात विशद केले आहे. गंगादर्शन, गंगास्नान आणि पितृतर्पण या मार्गाने मोक्ष साध्य करून घेता येतो, हे सत्य धर्मासुरींनी मान्य केले आहे.

गंगोपासकाने करावयाच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी या ग्रंथात सविस्तर मार्गदर्शन आहे. हा ग्रंथ वाचून सुरसरिता गंगेविषयी भाविकांचा भाव जागृत व्हावा आणि त्यांना भावपूर्णरित्या गंगोपासना करण्याची प्रेरणा मिळावी, अशी श्री गंगादेवीच्या चरणी प्रार्थना !

– संकलक

अर्पणमूल्य : रु. २०/-
संपर्क क्रमांक : ९३२२३१५३१७

'ऑनलाईन' खरेदीसाठी यावर क्लिक करा !

Leave a Comment