देवनदी गंगेचे रक्षण करा !

पवित्रतम गंगा नदी म्हणजे हिंदुस्थानचे राष्ट्रीय प्रतीक असलेली सरिता ! हिंदु संस्कृती, सभ्यता अन् परंपरा यांचा गाभा ! उत्तर आणि पूर्व भारताची जीवनरेखा ! साक्षात् देवीचे मूर्तीमंत रूप ! हिंदु धर्मातील मोक्षनिधान ! अशी ही सरित्श्रेष्ठा मृत्यूपंथाला लागणे, हा निर्सगाला देवतास्वरूप मानणार्‍या भारतियांच्या सभ्यतेचा पराभवच होय.

आज गंगा नदी संकटग्रस्त आहे. तिच्यावर प्रतिदिन अनेक मानवी आघात केले जात आहेत. अर्थलोलूप उद्योगपती आणि कर्तव्यचुकार नगर प्रशासन हे पवित्र गंगेत सांडपाणी सोडून तिला प्रदूषित करत आहेत. या जलप्रदूषणाने एवढे

गंभीर स्वरूप धारण केले आहे की, आज पतितपावन गंगेच्याच शुद्धीकरणाची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्यकर्त्यांनी महत्त्वाकांक्षेतून उभारलेली धरणे आणि जलविद्युत् प्रकल्प हे गंगेचे वाळवंटात रूपांतर करत आहेत. त्यामुळे ५० वर्षांनी केवळ हृषीकेश आणि हरिद्वार येथपर्यंतच गंगा नदी दिसेल ! जीवनदायिनी, आरोग्यदायिनी आणि मोक्षदायिनी गंगेची अशी दुर्दशा होईल, ही कल्पनाही आपल्या पूर्वजांनी केली नसेल ! गंगेची ही सद्यस्थिती प्रत्येक भारतियाला चिंताग्रस्त आणि क्षुब्ध करणे स्वाभाविकच आहे.

गंगेला स्वच्छ ठेवणे आणि तिचा प्रवाह अखंडित राहील, याचा आग्रह धरणे, हे आपले मानवीय, सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे. गंगा नदीचा आध्यात्मिक ठेवा जपण्यासाठी तिची निर्मळता, प्रवाहीपणा आणि पावित्र्य टिकवून ठेवणे अनिवार्य आहे. त्या दृष्टीने कित्येक आंदोलने उभी राहूनही देशातील राज्यकर्ते अद्याप उदासीनच आहेत. या ग्रंथात प्रामुख्याने गंगेवरील संकटांची कारणे आणि उपाययोजना यांचा वेध घेतला आहे.

विद्यमान निधर्मी लोकशाहीत गंगारक्षणास मर्यादा येत आहेत. खरेतर रामराज्यासारख्या आदर्श राष्ट्राची, म्हणजेच धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्रा’ची स्थापना करणे, हाच पवित्र गंगा नदीच्या रक्षणाचा खरा मार्ग आहे. याविषयीही या ग्रंथात प्रबोधन केले आहे. हा ग्रंथ वाचून गंगाभक्तांसह सर्व भारतियांनी गंगारक्षणासाठी ‘भगीरथ’ प्रयत्न करावेत आणि ‘हिंदू राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी कृतीशील योगदान द्यावे, ही श्री गंगादेवीच्या चरणी प्रार्थना !

– संकलक

अर्पणमूल्य : रु. २०/-

संपर्क क्रमांक : ९३२२३१५३१७

‘ऑनलाईन’ खरेदीसाठी यावर क्लिक करा !

Leave a Comment