मानवी जीवनाची नोट असेपर्यंतच तिचे महत्त्व जाणून साधना करा ! – परात्पर गुरु पांडे महाराज

भगवंताने दिलेल्या आयुष्याला कुणी महत्त्वच देत नाही. भगवंताने दिलेल्या चैतन्यशक्तीची उपयोगिता जीवनाच्या उद्धारासाठी न करता ती अनावश्यक व्यय केली जात आहे. मिळालेले मानवी जीवन हे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी आहे. त्यासाठी प्रतिदिन साधना करणे आवश्यक आहे. गुरूंच्या कृपाछत्राखाली साधना करून जीवन-मृत्यूच्या फे-यांतून यांतून सुटून भगवत्प्राप्ती करणे, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे.’

आद्यशंकराचार्य यांनी केलेले कार्य

अराजकाच्या काळात वैदिक धर्माला केवळ शाब्दिक पंडिताची नव्हे, तर क्रियाशील पंडिताची आवश्यकता होती. ज्याचे आचरण शुद्ध असेल, ज्याची बुद्धी सखोल आणि वाणी पवित्र असेल, ज्याच्या अंतरात सामान्य जनांच्या उद्धाराचा कळवळा असेल, असा कुणीतरी लोकोत्तर पुरुष त्या कामासाठी अवतरायला हवा होता. ‘हा मार्ग आहे आणि हेच (योग्य) कर्म आहे’, असे आपल्या वाणीने आणि कृतीने उद्घोषित करील, असा तो पुरुषश्रेष्ठ असायला हवा होता. भगवत्पूज्यपाद आद्यशंकराचार्य तशा महापुरुषाच्या रूपाने अवतरले.

प.पू. भास्करकाका यांच्या गुरुनिष्ठेची काही उदाहरणे

वडाळा महादेव येथील महायोगी प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांचे शिष्य आणि उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका यांनी १४ मेच्या पहाटे साडेसहा वाजता श्रीरामपूर येथील गुरुदेव काटेस्वामी आश्रमात देहत्याग केला. त्यांचे वय ६१ वर्षे होते. १५ मे या दिवशी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य

समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली आणि त्यावर आपल्या विचारांशी एकनिष्ठ असणार्‍या विद्वान, राष्ट्रप्रेमी अन् त्यागी महंतांची मठाधिपती म्हणून नेमणूक केली. त्यांनी सर्व भारतभरात एकूण १ सहस्र १०० मठांची स्थापना केली. ‘हे मठ आणि महंत, म्हणजे समर्थ संप्रदायाचा पाया आहे’, असे म्हटले जाते.

केवळ गुरुकृपेने आत्म्याचा शोध घेणे साध्य होणे ! – संत ज्ञानेश्‍वर

आध्यात्मिक उन्नती ही गुरूंविना होत नाही, तसेच कोणतेही ज्ञान गुरूंविना मिळत नाही. संत ज्ञानेश्वर हे संत मुक्ताबाई यांचे बंधू असले, तरी ते त्यांचे गुरुही होते. संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांच्यामध्ये झालेला संवाद या लेखात पाहूया.

कर्मस्थान – मनुष्यजन्माचे सार्थक करणारे कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचे स्थान !

परमेश्वर प्रत्येक जिवाला त्याच्या कर्मानुसार न्याय देतो. त्यामुळे मानवाकडून होणा-या प्रत्येक अपराधानुसार त्याला दंड मिळतो आणि हा दंड त्याला भोगूनच संपवावा लागतो. केवळ मनुष्य प्राण्यालाच बुद्धीने कुंडलीच्या माध्यमातून कर्माविषयी जाणून घेता येते, तसेच योग्य कर्म करून जन्माचे सार्थक (मोक्षप्राप्ती) करून घेणे शक्य होते.

कुंडलीतील रवि-मंगळ युती योग

रवि आणि मंगळ या दोन ग्रहांमध्ये अंशात्मक युती योग, केंद्र योग किंवा प्रतियोग असेल, तर अशा व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात धाडसी आणि पराक्रमी असल्याचे दिसते. रवि आणि मंगळ या ग्रहांमधील युती योग वेगवेगळ्या राशीतून आणि स्थानातून वेगवेगळी फळे देतात.

मोक्षपुरी हरिद्वार : स्थानमहात्म्य !

हिंदु एकतेचे असीम दर्शन घडवत प्रत्येक १२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा विश्वातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. सूर्य मेष राशीत आणि गुरु ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केल्यावर हरिद्वार येथे कुंभपर्व आयोजित होतो. गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा यांसारख्या धार्मिक कृतींसाठी कोट्यवधी हिंदू कुंभमेळ्याला येतात.

समर्थ रामदास स्वामी यांनी प्रवृत्तीवादाविषयी केलेले मार्गदर्शन

‘समर्थ रामदास स्वामी यांची जीवनदृष्टी आणि विचारसरणी, विचारांची परंपरा इतर संतांपेक्षा वेगळीच आहे. त्यांनी अन्य संतांप्रमाणे परमार्थाला महत्त्व दिले; पण तितकेच प्रवृत्तीवादाला सुद्धा दिले आहे.