मानवी जीवनाची नोट असेपर्यंतच तिचे महत्त्व जाणून साधना करा ! – परात्पर गुरु पांडे महाराज

भगवंताने दिलेल्या आयुष्याला कुणी महत्त्वच देत नाही. भगवंताने दिलेल्या चैतन्यशक्तीची उपयोगिता जीवनाच्या उद्धारासाठी न करता ती अनावश्यक व्यय केली जात आहे. मिळालेले मानवी जीवन हे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी आहे. त्यासाठी प्रतिदिन साधना करणे आवश्यक आहे. गुरूंच्या कृपाछत्राखाली साधना करून जीवन-मृत्यूच्या फे-यांतून यांतून सुटून भगवत्प्राप्ती करणे, हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे.’

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर त्यांचे सूक्ष्मातील चैतन्यमय अस्तित्व आणि त्यांची बहुमोल शिकवण यांची पू. शिवाजी वटकर यांनी पदोपदी घेतलेली प्रचीती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सलग ३ वर्षे परात्पर गुरु पांडे महाराज यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन रामप्रहरी मिळाला. त्या वेळी त्यांनी मला व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी पुष्कळ ज्ञान दिले.

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासारख्या बहुविध गुणांनी नटलेल्या आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या महान विभूतीचा जीवनपट उलगडणे खरेतर अशक्यप्रायच !

एकमेवाद्वितीय महान तपस्वी परात्पर गुरु पांडे महाराज !

परात्पर गुरु पांडे महाराज सनातनच्या कार्याशी काया-वाचा-मनाने पूर्णपणे एकरूप झाले होते. ‘गुरुकार्य गतीने व्हावे’, यासाठी ‘संस्था स्तरावर आणखी काय करता येईल ?’ याविषयी त्यांचे सतत चिंतन चालू असायचे.

प.पू. पांडे महाराज यांनी मृत्यू या विषयावर केलेले मार्गदर्शन

एखाद्याचा मृत्यू झाल्यावर आपण म्हणतो, मृत्यू झाला, म्हणजेच आता ती व्यक्ती नाही. वास्तविक तिचे अस्तित्व तिथे नसले, तरी तिचे स्थित्यंतर होऊन ती वेगळ्या स्वरूपात असतेच. ती आहे, या भावनेने त्याकडे पाहिल्यास, म्हणजे सकारात्मक भाव ठेवल्यास ती नसल्याचा भाव निर्माण होत नाही.