॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ६ – आत्मसयंमयोग (ध्यानयोग)

मनाला अंतर्मुख करून मनातील सर्व विचार थांबवावेत. चंचल मन जेथे जेथे भटकेल, तेथून त्याला वळवून अंतरात्म्यात लावावे. यामुळे रजोगुण निवृत्त झाल्यावर मन शांत होऊन ब्रह्मात असलेला आनंद मिळतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग

श्रीकृष्णाला सगळेच भक्त प्रिय असले, तरी ज्ञानी भक्त अत्यंत प्रिय असतो; कारण तो ईश्वराचेच स्वरूप असतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग

निर्गुण, निष्काम, अव्यक्त ईश्वराचे, श्रीकृष्णाचे स्मरण ठेवणारे जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्त होतात.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग

मन सतत ईश्‍वरात लावल्याने आणि ईश्‍वराची अनन्यभक्ती केल्याने भक्त ईश्‍वराशी सतत जुडलेला रहातो आणि ईश्‍वरालाच प्राप्त होतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १० – विभूतीयोग

आत्म्याचा भाव म्हणजे अंतःकरण. त्यात स्थित ईश्‍वर अविवेकाने होणार्‍या चुकीच्या समजांना विवेक आणि बुद्धीने नष्ट करतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ११ – विश्‍वरूपदर्शनयोग

सर्व कर्मे ईश्‍वरासाठी करणे, ईश्‍वराला परम आश्रय मानून आसक्तीरहित होऊन आणि कोणाविषयीही वैरभाव न बाळगता ईश्‍वराची भक्ती करणे, अशी भक्ती करतो, तो ईश्‍वराला प्राप्त होतो.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १२ – भक्तियोग

ध्यान, सराव, ईश्‍वराच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न, कर्मे ईश्‍वराला अर्पण करणे, यातील कुठल्याही साधनेने क्रमाक्रमाने चित्तशुद्धी होऊन ईश्‍वरप्राप्ती होते.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १३ – क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग

शरीर क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा जीवात्मा क्षेत्रज्ञ आहे. सर्व क्षेत्रांमधला क्षेत्रज्ञ, म्हणजे सर्व प्राणीमात्रांमधील जीवात्मा हा ईश्वरच (ईश्वराचा अंश) आहे.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग

श्रीकृष्णांची अनन्यतेने, श्रद्धेने भक्ती करणे यामुळे त्रिगुणांचे उल्लंघन करून ब्रह्मप्राप्तीची योग्यता येते.

॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग

उत्तम पुरुष परमात्मा आहे आणि तिन्ही लोकांना धारण करूनही त्यांच्यापासून निर्लिप्त आहे. उत्तम पुरुषाची कास धरून आपली उन्नती करून घ्यायची आणि जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त व्हायचे, हे आपल्या हातात आहे.