स्मृतिकार आणि गोत्रप्रवर्तक पराशर ॠषि यांचे तपोस्थळ अन् ‘पराशर ताल’

महर्षि व्यास यांचे पिता पराशर ऋषि यांचे कुल्लु (हिमाचल प्रदेश) येथील तपोस्थळ आणि पराशर ताल यांचे छायाचित्रात्मक दर्शन !

विलोभनीय दर्शन : हिमाचल प्रदेशातील दैवी आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये असलेले ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ !

‘आतापर्यंत आम्ही श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत कैलास-मानससरोवर, अमरनाथ, गंडकी-मुक्तीनाथ, ज्योर्तिलिंग, शक्तिपीठ इत्यादी अनेक ठिकाणी प्रवास केला आहे; मात्र त्या सर्वांमध्ये ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ येथील प्रवास वैशिष्ट्यपूर्ण आहे.

सियाराम बाबा : एक अलौकिक संत !

त्यांनी १० वर्षांपर्यंत खडेश्वरी तपश्चर्या केली आहे. यात तपस्वी झोपण्यापासून सर्व कामे उभ्यानेच करत असतात. बाबा खडेश्वरी साधना करत असतांना नर्मदेला पूर आला होता; परंतु ते त्यांच्या जागेवरून बाजूला झाले नाहीत. तेव्हा पुराचे पाणी बाबांच्या केवळ नाभीपर्यंत पोचू शकले होते.

हिंदु धर्मामध्येच स्त्री-पुरुषांना समान मान !

जगामधील सर्व धर्मांपैकी केवळ आपल्या हिंदु धर्मात स्त्रीला ‘शक्ती’ (प्रकृती), तर पुरुषाला ‘शिव’ मानून त्यांच्या मीलनातून सृष्टीची निर्मिती झाल्याचा सिद्धांत मांडला आहे.

महर्षि अत्री यांचे सुपुत्र आणि शिवाचे अंशावतार दुर्वासऋषि यांच्या तपोभूमीचे भावपूर्ण दर्शन !

महर्षि अत्री आणि ऋषिपत्नी अनुसूया यांनी केलेल्या कठीण तपामुळे साक्षात् शिव ‘दुर्वासऋषि’ यांच्या रूपात अवतरले. आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र हा ब्रह्मदेवाचा अंश आहे, आणि तो महर्षि अत्री अन् अनुसूया यांचा सुपुत्र आहे, तसेच तो दुर्वासऋषि यांचा भाऊ आहे.

सक्षम अन् कणखर असलेली प्राचीन स्त्री आणि अबला आधुनिक स्त्री !

अद्ययावत होऊ पहाणारी, पैसे बेगुमान उधळणारी, मनमानी करणारी, एकाकी, सिगरेट पिणारी, मद्यपान करणारी, उपहारगृहामध्ये पुरुषासमवेत एकटी रहाणारी ती शूर, स्वतंत्र नि मुक्त आहे का ?

सीता हीच भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श आहे ! – स्वामी विवेकानंद

‘स्त्री-शिक्षणाचा प्रचार हा धर्माला केंद्र करूनच व्हावयास हवा. इतर सर्व शिक्षण, वळण धर्माच्या तुलनेत गौणच असावयास हवे. धर्मशिक्षण, शीलसंवर्धन आणि कठोर ब्रह्मचर्यपालन यांकडे लक्ष पुरवावयास हवे.

प्रसंगी क्षात्रधर्म अंगीकारणार्‍या हिंदु स्त्रिया !

मनाने आणि शरिराने कोमल असणार्‍या भारतीय नारी वेळप्रसंगी रणरागिणीचे रूप घेऊन विरांगनाही होतात, असे सिद्ध झाले आहे.

देवर्षि नारद

देवर्षि नारद हे भगवान विष्णूंचे मोठे भक्त आहेत. हिंदु धर्मात त्यांना ब्रह्माचे पुत्र मानले जाते. नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत.

गुरुभक्तीचा आदर्श असलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे शिष्य प.पू. भास्करकाका !

वडाळा महादेव (जिल्हा नगर) येथील महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका कुशाग्र आणि बुद्धीवान होते. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यांनी मद्रास (आयआयटी) येथेसुद्धा शिक्षण घेतले होते. त्यांनी महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची ३५ वर्षे निरंतर सेवा केली.