फल-ज्योतिषशास्त्रातील मूलभूत घटक : ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने
फल-ज्योतिषशास्त्र हे ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने या ३ मूलभूत घटकांवर आधारित आहे. या ३ घटकांमुळे भविष्य दिग्दर्शन करणे शक्य होते. या ३ घटकांची तोंडओळख या लेखाद्वारे करून घेऊया.
फल-ज्योतिषशास्त्र हे ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने या ३ मूलभूत घटकांवर आधारित आहे. या ३ घटकांमुळे भविष्य दिग्दर्शन करणे शक्य होते. या ३ घटकांची तोंडओळख या लेखाद्वारे करून घेऊया.
सामान्यतः बोलीभाषेत आपण ‘सूर्य सकाळी अन् चंद्र रात्री उदय पावतो’, असे म्हणतो. सूर्याच्या संदर्भात हे योग्य असले, तरी चंद्राच्या बाबतीत तसे नाही. चंद्रोदय प्रतिदिन वेगवेगळ्या वेळी होतो. त्याविषयीची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.
सूर्य आणि चंद्र हे कालपुरुषाचे नेत्र समजले जातात. सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणांमुळे आपल्याला काळ मोजता येतो अन् त्याचा व्यवहारात उपयोगही करता येतो. ‘वर्ष, अयन, ऋतू, मास आणि पक्ष’ या नैसर्गिक कालविभागांची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोषांच्या निवारणासाठी ग्रहदेवतांची उपासना करण्यास सांगितले जाते. या उपासना करण्यामागील उद्देश आणि त्यांचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.
भारतात रत्नांचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. प्राचीन ऋषी, ज्योतिषी, वैद्याचार्य आदींनी त्यांच्या ग्रंथांमध्ये ‘रत्नांचे गुणधर्म आणि उपयोग’ यासंबंधी विवेचन केले आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहदोषांच्या निवारणासाठी रत्नांचा उपयोग केला जातो. रत्ने धारण करण्यामागील उद्देश आणि त्यांचा उपयोग या लेखाद्वारे समजून घेऊया.
शनि ग्रहाची ‘साडेसाती’ म्हटली की सामान्यतः आपल्याला भीती वाटते. ‘माझा वाईट काळ चालू होणार, संकटांची मालिका चालू होणार’, इत्यादी विचार मनात येतात; परंतु साडेसाती सर्वथा अनिष्ट नसते. या लेखाद्वारे ‘साडेसाती म्हणजे काय आणि साडेसाती असतांना आपल्याला काय लाभ होऊ शकतात’, याविषयी जाणून घेऊया.
भारतात प्राचीन काळापासून महत्त्वाचे कार्य शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. आपल्या दैनंदिन जीवनात मुहूर्तांचा संबंध वेळोवेळी येतो. मुहूर्त या विषयाची प्राथमिक माहिती या लेखाद्वारे समजून घेऊया.
भारतीय कालमापन पद्धतीत ‘तिथी’ला महत्त्व आहे; परंतु सध्याच्या ‘ग्रेगोरीयन’ (युरोपीय) कालगणनेमुळे भारतात तिथीचा उपयोग व्यवहारात न होता केवळ धार्मिक कार्यांसाठी होतो. प्रस्तुत लेखाद्वारे तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत समजून घेऊया.
महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे कुलदैवत खंडोबा हे आहे. क्षत्रिय बाण्याचा देव म्हणून मराठ्यांना हा विशेष प्रिय वाटतो. ‘जयाद्रि माहात्म्य’ यात या खंडोबादेवाचे महत्त्व वर्णन केले आहे. रामोशी, धनगर जातीचे लोक हेही खंडोबाची उपासना करतात. प्राणीवर्गांत कुत्र्याच्या रूपात खंडोबा वास करतो, अशी समज आहे.
हिंदु समाजात बाळाचा जन्म झाल्यावर ज्योतिषाकडून बाळाची जन्मपत्रिका बनवून घेतली जाते. अनेकांना पत्रिकेत काय माहिती असते, याविषयी उत्सुकता असते. या लेखाद्वारे ‘जन्मपत्रिका म्हणजे काय आणि पत्रिकेत कोणती माहिती अंतर्भूत असते’, याविषयी समजून घेऊया.