सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत ! – स्वामी श्री धर्मदास महाराज

सनातनचे प्रदर्शन पाहून प्रसन्नता मिळाली. हे ग्रंथप्रदर्शन पाहून माझी भावजागृती झाली. सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत.

कोलकाता येथील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज यांची सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून भेट

कोलकाता येथील जादवपूरमधील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज आणि त्यांच्या गुरुमाता श्री अर्चना पुरी माँ यांची नुकतीच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंतो देबनाथ आणि श्री. शंभू गवारे यांनी भेट घेऊन सनातन संस्था अन् समिती यांच्या कार्याची माहिती दिली.

घाटकोपर, मुंबई येथील संत पू. जोशीबाबा यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

आश्रम भेटीच्या वेळी पू. जोशीबाबा म्हणाले, परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधक करत असलेली आध्यात्मिक प्रगती, सिद्ध होत असलेले संत हे सनातनचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. अध्यात्म कृतीत आणण्यासाठी आवश्यक असलेला समर्पणभाव साधकांमध्ये ठायीठायी आढळतो.’’

सनातनच्या साधकांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद ! – श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंदतीर्थ महास्वामीजी

श्री महास्वामीजींनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले,सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही धीरोदात्तपणे कार्य करत आहात. तुम्हा सर्वांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद आहेत.

सनातनच्या कार्यास माझे आशीर्वाद ! – श्री महास्वामीजी

चेंबूर येथील श्री. हरिहरपुत्र भजन समाज मंदिरात ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत श्री महास्वामीजींचा सुवर्ण जन्मजयंती महोत्सव भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले हेच ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार आहेत ! – प.पू. देवबाबा

परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत. तेच ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार आहेत. त्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून सनातनचे साधक श्रीकृष्णाचे चित्र सप्तचक्रांवर उपायांसाठी लावतात, असे उद्गार कर्नाटक येथील शक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी काढले.

भारताला पुन्हा आध्यात्मिक देश बनवण्याचे आपले एकच लक्ष्य ! – बाबा उमाकांतजी महाराज

उमाकांतजी महाराज यांचा जन्म उत्तरप्रदेश येथे झाला असून बाबा जयगुरुदेवजी महाराज हे त्यांचे गुरु होत. वर्ष २००७ पासून गुरूंच्या आज्ञेने बाबा उमाकांतजी महाराज धर्मस्थापना आणि लोकांच्या जीवनाचा उद्धार व्हावा, यांसाठी कार्य करू लागले.

श्री नवनाथ महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे. तुम्ही त्यांचे चरण सोडू नका. तुम्हाला त्याचे फळ ते नक्कीच देतील.

कर्नाटकमधील ज्ञानानंद आश्रमाचे स्वामी शिवात्मानंद सरस्वती यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.

सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र ! – समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी

सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र आहे. येथे सेवाही साधना म्हणून आणि नामजप करत केली जाते, असे मार्गदर्शन दादेगाव, तालुका अष्टी, जिल्हा बीड येथील समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी यांनी केले.