मिरज येथील नाथ संप्रदायातील उपासक श्री. संतोेष सदाशिव दाभाडे (माऊली) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. संतोेष सदाशिव दाभाडे (माऊली) यांच्याशी संवाद साधतांना सनातन संस्थेचे श्री. राम होनप (डावीकडे)

रामनाथी, गोवा – मिरज येथील श्री. संतोेष सदाशिव दाभाडे (माऊली) यांनी २४ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातन संस्थेचे साधक श्री. प्रशांत कोयंडे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म यांविषयीचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र श्री. मयुर दाभाडे, तसेच सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. या भेटीनिमित्त त्यांच्याशी सनातन संस्थेचे सूक्ष्मज्ञान-प्राप्तकर्ते श्री. राम होनप यांनी संवाद साधला.

या वेळी त्यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून संगीत साधना करणार्‍या साधकांना सूक्ष्मज्ञानाद्वारे मार्गदर्शन केले. राष्ट्र आणि धर्म आदी विषयासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नांनाही त्यांनी सूक्ष्मज्ञानाद्वारे उत्तरे दिली. ‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे’, असे त्यांनी या वेळी ठामपणे सांगितले.

अभिप्राय

आश्रमातील कार्याविषयी जाणून घेतल्यानंतर श्री. दाभाडे (माऊली) म्हणाले,

१. मी गेल्या ५ वर्षांपासून रामनाथी आश्रमात येण्याची वाट पहात होतो. ही संधी मला आज मिळाली.

२. आश्रमात साधकांच्या समवेत निर्जिव वस्तूंमध्येही पुष्कळ प्रमाणात चैतन्य जाणवते.

३. येथे जे साधक गुरूंचे आज्ञापालन करतात, तसे इतर ठिकाणी पहायला मिळत नाही.

क्षणचित्र

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले पूर्वी रहात असलेल्या आश्रमातील खोलीचे दर्शन घेतल्यावर श्री. दाभाडे (माऊली) म्हणाले, ‘‘आध्यात्मिक अवस्था साधना केल्याने साध्य होते; पण येथे ती सहज साध्य होते.’’

 

श्री. संतोेष सदाशिव दाभाडे (माऊली) यांचा संक्षिप्त परिचय

श्री. संतोेष सदाशिव दाभाडे (माऊली) नाथ संप्रदायाशी संलग्न आहेत. त्यांना इयत्ता चौथीपासून सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होत आहे. त्यांनी समाजातील सहस्रो भक्तांवर आध्यात्मिक उपाय केेलेे असून त्यांच्या दैवी उपायांची अनुभूती अनेकांनी घेतली आहे. ते तबला विशारद असून हिलिंग थेरेपी, रेकी यांतील तज्ञ आहेत. त्यांनी मार्शल आर्टद्वारे ‘ब्लॅक बेल्ट थर्ड’ यातही कौशल्य प्राप्त केले आहे. ते दैनिक सनातन प्रभातचे वाचक आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment