उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी साई ईश्‍वर यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

गुरुजी साई ईश्‍वर यांना आश्रमातील ध्यानमंदिर दाखवतांना सौ. विद्या शानभाग

रामनाथी, गोवा – उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी साई ईश्‍वर यांनी १६ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली. सनातन संस्थेच्या साधिका सौ. विद्या शानभाग यांनी गुरुजी साई ईश्‍वर यांना याविषयी अवगत केले. या प्रसंगी गुरुजी साई यांच्या समवेत त्यांचे भक्तगण उपस्थित होते.

सनातन संस्थेचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी हार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गुरुजी साई ईश्‍वर यांचा सन्मान केला. या वेळी त्यांनी ‘आश्रमातील वास्तव्य मला पुष्कळ आवडले. रामनाथी आश्रमात येण्याचे माझे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले’, असे उद्गार गुरुजी साई ईश्‍वर यांनी काढले.

क्षणचित्रे

१. गुरुजी साई ईश्‍वर यांच्याकडे प्रत्येक आठवड्याला होणार्‍या कार्यक्रमात त्यांनी सनातन संस्थेच्या साधकांना अर्धा घंटा धर्माविषयी मार्गदर्शन करण्याची अनुमती दिली. त्यांच्या भागात हिंदूंच्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे रोखण्यासाठी एकत्रित कार्य करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केेला.

२. ‘आश्रमात मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या’, असे गुरुजी साई ईश्‍वर यांनी सांगितले. मुख्यत्वे आश्रमातील शिस्त त्यांना अधिक भावली.

३. आश्रमात असलेल्या अन्नपूर्ण कक्षातील (स्वयंपाकघरातील) भाजीपाल्याची वर्गवारी करून ठेवण्याची शिस्तबद्ध पद्धत पाहून ते पुष्कळ प्रभावित झाले. त्यांच्या अन्नदानाच्या उपक्रमातही भाज्या ठेवण्यासाठी अशाच प्रकारची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

४. या वेळी गुरुजींनी साधकांच्या शारीरिक व्याधींवर ‘हिलिंग’ उपचारपद्धतीद्वारे उपचार केले.

 

गुरुजी साई ईश्‍वर यांचा संक्षिप्त परिचय

शंकरपुरा, उडुपी (कर्नाकट) येथील गुरुजी साई ईश्‍वर हे यु.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरण, लोलक, वास्तुशास्त्र आणि संख्याशास्त्र यांचे गाढे अभ्यासक आहेत. ते ‘साईस्पर्श’ पद्धतीने शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्तींवर उपचार करतात. यामध्ये ते व्यक्तीच्या सप्तकुंडली चक्रांना सूक्ष्मातून स्पर्श करून त्यावर ‘हिलिंग’ या उपायपद्धतीच्या माध्यमातून उपाय करतात. ते ‘साईविद्या’ या न्यासाचे संचालक आहेत. या न्यासाच्या माध्यमातून गरीब मुलांच्या शिक्षणाचे दायित्व घेतले जाते, तसेच रस्त्यावर मृत पावलेले पशू आणि प्राणी यांचे विधीवत अग्निसंस्कारही केले जातात. यासाठी कर्नाटकमधील दोन जिल्ह्यांत त्यांची एक रुग्णवाहिका सतत फिरत असते. यासमवेतच त्यांच्याकडून गोरगरीब, गरजू यांना अन्नदान केले जाते. हे करत असतांना ‘साईबाबांच्या प्रेरणेने त्यांच्याकडून हे कार्य होत आहे’, असा त्यांचा भाव असतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment