किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट

प.पू. देवबाबा

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (वार्ता.) – किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे प.पू. देवबाबा यांनी २३ जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट दिली. पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये आश्रमात असतांनाच प्रीतीस्वरूप प.पू. देवबाबा यांचेही आश्रमात आगमन झाल्यामुळे सर्व साधकांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. या वेळी सनातन संस्थेचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच प.पू. देवबाबा यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या शिष्या कु. प्रसन्नालक्ष्मी यांचा सत्कार सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केला. या वेळी संत प.पू. आबा उपाध्ये आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment