बेंगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध उद्योजक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संजय गुप्‍ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट !

(डावीकडून) १. उद्योजक श्री. सुनील गोयल, २. उद्योजक तथा ‘फाऊंडेशन इंडिया’ चे सरचिटणीस श्री. संजय गुप्‍ता, ३. उद्योजक श्री. विकास सिंगला, ४. उद्योजक श्री. विजयानंद गुप्‍ता, ५. उद्योजक श्री. मधुसुदन अगरवाल यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची माहिती सांगतांना ६. श्री. अमोल हंबर्डे

रामनाथी (गोवा) – बेंगळुरू, कर्नाटक येथील प्रसिद्ध उद्योजक, हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि ‘फाऊंडेशन इंडिया’चे सरचिटणीस श्री. संजय गुप्‍ता यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला १ ऑक्‍टोबर २०२३ या दिवशी सदिच्‍छा भेट दिली. या वेळी त्‍यांच्‍या सोबत त्‍यांच्‍या पत्नी आणि अन्‍य ५ उद्योजक त्‍यांच्‍या कुटुंबियांसह उपस्‍थित होते.

सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे यांनी त्‍यांना आश्रम दाखवला आणि आश्रमात चालू असलेल्‍या राष्‍ट्र आणि धर्म, तसेच आध्‍यात्मिक संशोधन यांविषयीच्‍या कार्याची  माहिती दिली.

आश्रम पाहून अभिप्राय व्‍यक्‍त करतांना श्री. संजय गुप्‍ता म्‍हणाले की, आश्रमातील वातावरण शांत आणि स्‍थिर आहे. साधक आश्रमात राहून पूर्ण समर्पणभावाने करत असलेले कार्य अद़्‍भुत आहे.

Leave a Comment