मध्‍यप्रदेशातील डॉ. विष्‍णु जोबनपुत्र यांची सपत्नीक रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट !

डॉ. विष्‍णु जोबनपुत्र अन् त्‍यांच्‍या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची माहिती सांगतांना अधिवक्‍ते योगेश जलतारे

रामनाथी (गोवा) –  मध्‍यप्रदेशमधील विदिशा जिल्‍ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्‍गुरु सेवा संघ ट्रस्‍ट’चे विश्‍वस्‍त आणि सद़्‍गुरु संकल्‍प नेत्र चिकित्‍सालयाचे संचालक  डॉ. विष्‍णु जोबनपुत्र अन् त्‍यांच्‍या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी ७ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट दिली.

सनातनचे साधक अधिवक्‍ता योगेश जलतारे यांनी डॉ. जोबनपुत्र आणि त्‍यांच्‍या पत्नी यांना आश्रमात चालू असलेल्‍या राष्‍ट्र अन् धर्म यांच्‍या कार्याची, तसेच आध्‍यात्मिक संशोधनाविषयी माहिती सांगितली.

आश्रम पाहून डॉ. जोबनपुत्र यांनी व्‍यक्‍त केलेला अभिप्राय

आश्रमातील सर्व कार्य अद़्‍भुत आहे. अशी संस्‍था अस्‍तित्‍वात आहे, हे अविश्‍वसनीय आहे. येथील प्रत्‍येक साधकात उत्‍कट भाव आहे. समाज परिवर्तनासाठी अशा (सनातनसारख्‍या) सहस्रो संस्‍थांची देशाला आवश्‍यकता आहे.

Leave a Comment