महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

ध्यानमंदिरात दर्शन घेतांना उजवीकडून अभय वर्तक, मंत्री रवींद्र चव्हाण, प्रभाकर सावंत, रणजित देसाई आणि अन्य

कुडाळ – महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांनी १ नोव्हेंबर या दिवशी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट दिली. मंत्री रवींद्र चव्हाण आणि सहकारी यांचे आगमन झाल्यानंतर सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी त्यांना सनातनच्या सेवाकेंद्राची माहिती दिली. सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेतले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सेवाकेंद्रात चालणार्‍या सेवांविषयी माहिती जाणून घेतली, तसेच येथे सेवारत असलेल्या साधकांची मंत्री चव्हाण यांनी आस्थेने विचारपूस केली.

मंत्री रवींद्र चव्हाण यांना सनातन निर्मित श्री गणेशाची प्रतिमा देतांना डावीकडून अभय वर्तक, सोबत डावीकडून रणजित देसाई, राजन तेली, प्रभाकर सावंत, निरंजन डावखरे आणि अतुल काळसेकर

या वेळी भाजपचे माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आमदार निरंजन डावखरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, पिंगुळीचे सरपंच अजय आकेरकर, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद (भाई) सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

साधकांनी फलकावर लिहिलेल्या चुका लक्षपूर्वक वाचून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया समजून घेतली. येथील फलकावर साधिका कु. वैदेही खाडये हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे लिखाण लिहिले होते. तेे वाचल्यावर मंत्री चव्हाण यांनी कु. वैदेही हिला बोलावून घेऊन स्वत: शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केले. मंत्री चव्हाण यांनी निघतांना सर्व साधकांसह ‘सनातन हिंदु धर्म की जय’ ही घोषणा उत्स्फूर्तपणे दिली आणि ‘हिंदु राष्ट्र येणारच’, असे आश्‍वासक उद्गार काढले.

Leave a Comment