सुप्रसिद्ध संवादिनीवादक सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध संवादिनीवादक (‘हार्मोनियम’वादक) सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि गोव्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कु. मुग्धा वैशंपायन यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

कु. मुग्धा वैशंपायन या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातील अंतिम ५ गायकांपैकी एक आहेत.त्यांना ‘रायगड भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित लोक सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत ! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश

सनातन धर्मासाठी सनातन संस्था निःस्वार्थीपणे अखंड कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक उच्चशिक्षित सर्वस्वाचा त्याग करून सेवारत आहेत.

रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेशचंद्र रतन यांची सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली भेट !

श्री. रमेशचंद्र रतन यांनी सनातन संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. त्यावर त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘पुढे कधीही रेल्वेशी संबंधित काही साहाय्य पाहिजे असल्यास मी सेवेसाठी सदैव तत्पर आहे.’’

पुणे येथील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

भाजपचे पुणे येथील आमदार श्री. सुनील कांबळे यांनी १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे आणि काही कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते.

श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड (कर्नाटक) येथील संत श्री परमात्माजी महाराज यांची वाराणसी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्राविषयी सांगितले होते आणि आता समाजालाच नव्हे, तर संतांनादेखील हिंदु राष्ट्राविषयी कुठेतरी जाणीव व्हायला लागली आहे, असे प्रतिपादन श्री क्षेत्र द्वारापूर,…

सनातनने मठ-मंदिरे यांच्या सुव्यवस्थापनाचे शिक्षण द्यावे ! – श्री. संजय शर्मा

आश्रमातील स्वच्छता, पावित्र्य आणि आध्यात्मिक सौंदर्य अप्रतिम आहे. आश्रमात घडलेले साधक मंदिरांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. त्यामुळे सनातनने ‘मठ-मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’, याचे शिक्षण समाजाला द्यावे, असे मत ‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. संजय शर्मा यांनी व्यक्त केले.

सनातन संस्था उत्तम रितीने धर्मकार्य करत आहे ! – श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी

सनातनच्या चैतन्यदायी ग्रंथांचा लाभ समाजातील अधिकाधिक लोकांना व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.

हिंदूंना धर्मज्ञान देण्याचे सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य ! – श्री श्री विदुशेखर भारती महास्वामीजी, उत्तराधिकारी, श्रृंगेरी श्री शारदा पीठ

आम्ही अनेक वर्षांपासून सनातनच्या संपर्कात आहोत. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले चालू आहे, असे गौरवोद्गार दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कन्याडी येथील श्री श्री श्री सद्गुरु ब्रह्मानंद सरस्वती महाराज यांनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी काढले.

भारत हिंदु राष्ट्र होणार ! – स्वामी आनंद स्वरूप, अध्यक्ष, शंकराचार्य परिषद

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेले ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याविषयीचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माझे ठाम मत झाले आहे की, भारत हिंदु राष्ट्र होणार आहे. आजही हिंदुत्वावर काम करणारे अनेक लोक स्वत:ला निधर्मी समजत आहेत. अशा वेळी समिती आणि संस्था यांच्या वतीने प्रदर्शन, संवाद, प्रवचन, सत्संग या माध्यमातून धर्मप्रचाराचे कार्य प्रभावीपणे चालू आहेे. या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, असे प्रतिपादन शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी येथे केले.