रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार

१. आश्रमदर्शन अत्यंत हृदयस्पर्शी होते !

‘आश्रम अतिशय सुंदर आहे. येथे आल्यावर मला वाटले, ‘जणू मी या पृथ्वीवरील दुसर्‍या जगात आलो आहे.’ माझ्या अंतःकरणातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.’

– श्री. अभिषेक जोशी, अध्यक्ष, ओडिशा सुराख्य सेना, कटक, ओडिशा. (२९.५.२०१९)

२. ‘आश्रमदर्शन हा माझ्यासाठी एक अतिशय सुंदर अनुभव होता. येथे पुष्कळ सकारात्मक शक्ती आहे. येथे यायला मिळाल्याबद्दल धन्य वाटले.’

– श्री. जयेंद्रसिंह झाला, वडोदरा, गुजरात. (२९.५.२०१९)

३. ‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यानंतर मला सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अंतरंगातून जाणून घेणे शक्य झाले.’

– श्री. जयप्रकाश वेंकटरमण, वेल्लोरे, तमिळनाडू.

४. ‘रामनाथी आश्रम पाहून मला साधक-जीवनाविषयी प्रेरणा मिळाली.’

– श्री. बिनिल सोमसुंदरम्, प्रांतीय सहसंयोजक, हिंदू हेल्पलाईन, एर्नाकुलम्, केरळ.

 

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

१. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन हे सत्याचे दर्शन घडवणारे आहे. आम्हाला ते पहाण्याचे भाग्य लाभले. प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तू अतिशय अर्थपूर्ण आहेत.’

– श्री. अभिषेक जोशी, अध्यक्ष, ओडिशा सुराख्य सेना, कटक, ओडिशा.

२. ‘प्रदर्शनातील वस्तूंवरील दैवी कण पाहून माझ्या मनातील सकारात्मकता वाढली.’

– श्री. जयेंद्रसिंह झाला, वडोदरा, गुजरात.

३. ‘हे प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट असून यातून सनातन संस्थेच्या कार्याविषयीची माहिती मिळाली.’

– श्री. जयप्रकाश वेंकटरमण, वेल्लोर, तमिळनाडू.

४. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन अविश्वसनीय आहे; परंतु ते सत्यही आहे. हा विरोधाभास आहे.’

– श्री. एस्. भास्करन्, अध्यक्ष, किल करप्शन सेव्ह इंडिया फोरम, बेंगळुरू, कर्नाटक.

५. ‘सकारात्मक शक्ती आणि नकारात्मक शक्ती यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो; मात्र सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून त्या परिणामांतील भेद लक्षात आले.’

– श्री. बिनिल सोमसुंदरम्, प्रांतीय सहसंयोजक, हिंदू हेल्पलाईन, एर्नाकुलम्, केरळ. (३१.५.२०१९)

६. ‘हिंदु राष्ट्र येथून (रामनाथी आश्रमातून) होणार आहे आणि हे हिंदु राष्ट्राचे मंदिर आहे.’

– श्री. नितीन केशव काकडे, शहरप्रमुख, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संघटना, कोल्हापूर.

७. ‘रामनाथी आश्रमात मला सकारात्मक ऊर्जेचा स्रोत जाणवला.’

– अधिवक्त्या (सौ.) सीमा साळुंके, पुणे

८. ‘आश्रमात पुष्कळ स्वच्छता आहे. साधकांना ‘हे आपले काम आहे’, असे वाटून ते हे सर्व प्रामाणिकपणे करत आहेत. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र येथूनच चालू होणार आहे’, असे मला वाटते.’

– श्री. दीपक आ. यादव, शिवसेना ग्राहक संरक्षक कक्ष, जिल्हा प्रमुख, कोल्हापूर. (११.६.२०२२)

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
दैवी कण :  सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.

Leave a Comment