उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष श्री. सतीश महाना
यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

लक्ष्मणपुरी – सनातन धर्मासाठी सनातन संस्था निःस्वार्थीपणे अखंड कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक उच्चशिक्षित, तसेच डॉक्टर, अधिवक्ता, अभियंता आदी सर्वस्वाचा त्याग करून सनातन धर्माच्या उत्थानासाठी सेवारत आहेत, असे गौरवोद्गार उत्तरप्रदेश राज्याचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष श्री. सतीश महाना यांनी काढले. सनातन संस्थेच्या साधिका सौ. प्राची जुवेकर यांनी श्री. महाना यांची भेट घेतली असतांना त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. निलेश सिंगबाळ आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी हेही उपस्थित होते. या वेळी श्री. महाना यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. पू. निलेश सिंगबाळ यांनी श्री. महाना यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट दिली, तर सौ. प्राची जुवेकर यांनी श्री. महाना यांना सनातनचा ग्रंथ भेट दिला. या प्रसंगी श्री. महाना यांनी पूर्वी गोव्यातील सनातनच्या आश्रम भेट दिली होती. तेव्हा त्यांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव त्यांनी सांगितले.
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !
राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
बिहारच्या आमदारांची गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !