सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्यासाठी आमचा वृंदावन येथील आश्रम समर्पित करतो ! – आचार्य रमाकांत गोस्वामी, वृंदावन, उत्तरप्रदेश

भारतातील प्रत्येक जिल्ह्यात संस्थेने शाखा उघडली पाहिजे. वृंदावन येथील संस्थेच्या प्रसाराचे उत्तरदायित्व मी घेण्यास सिद्ध असून सनातनच्या धर्मप्रसार कार्यासाठी आमचा वृंदावन येथील आश्रम समर्पित करतो, असे प्रतिपादन श्रीजीबाबा गोधामचे अध्यक्ष ब्रजभक्त तथा कथावाचक आचार्य रमाकांत गोस्वामी यांनी १ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातनच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे ! – ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज, पंढरपूर

सनातन संस्थेने भारतीय संस्कृतीवर आधारित प्रदर्शन लावल्यामुळेे आपल्या परंपरांचे महत्त्व लोकांना कळत आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी येथे केले.

सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून साधना, राष्ट्र व धर्मरक्षण करण्यासाठी अनेकांना ज्ञान मिळत आहे – आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज

सध्या स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागले आहे. यामुळेच अनेक अनर्थ होऊ लागले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी ही वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, असे प्रतिपादन सातारा येथील तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर मठाचे श्री.ष.ब्र.प्र.१०८ आदिश्वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांनी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न ! – साध्वी डॉ. प्राची

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी येथे केले.

भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे ! – श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज

जगात अन्य धर्मियांची राष्ट्रे आहेत; परंतु हिंदूंचे कोणतेही राष्ट्र नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे. यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे, असे प्रतिपादन श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज यांनी प्रयागराज येथे केले.

संस्कृती आणि धर्म यांची मनुष्यामध्ये जागृती होण्यासाठी सनातनचे ग्रंथप्रदर्शन उत्कृष्ट आहे ! – डॉ. आशिष गौतम, अध्यक्ष, दिव्य प्रेमा सेवा मिशन

‘वर्तमान पिढी आणि येणा-या पिढीचे विचार जुळत नाहीत. या दृष्टीने या पिढ्यांचे हित साधण्यासाठी आणि या पिढ्यांना एकत्र करण्यासाठी सनातन संस्था सार्थकपणे प्रयत्न करत आहे, अशी प्रदर्शन पाहिल्यानंतर जाणीव होते.

सनातनचे जनजागृतीचे कार्य भविष्यात प्रखर सूर्याप्रमाणे प्रकाशमान होईल ! – महामंडलेश्‍वर १००८ श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज

श्री स्वामी शांती स्वरूपानंद गिरी महाराज यांनी ३० जानेवारी या दिवशी सनातनच्या प्रयागराज येथे आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली.

प्रयागराज (कुंभनगरी) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला श्री अभिषेक महाराज यांची सदिच्छा भेट

दरबार श्री पिंडोंरी धामचे श्री अभिषेक महाराज यांनी २७ जानेवारीला येथील कुंभमेळ्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली.

सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहून मला येथून जावेसे वाटत नाही ! – महंत श्री देवनारायणदास वेदांताचार्य महाराज, कानपूर, उत्तरप्रदेश

महंत देवनारायणदास वेदांताचार्य महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेले महंत श्री वैष्णुदास बिथान (बिहार) यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

सनातनच्या कार्याला माझेही सहकार्य असेल ! – श्री महंत कृष्णदास महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अग्नि आखाडा

सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय चांगले आहे. असे प्रदर्शन लावल्यामुळे अध्यात्मप्रसार होऊन देशात हळूहळू सर्वत्र जागृती होईल.