सनातन संस्थेचे कार्य संन्यस्तपदाकडे जाण्याचे आहे ! – महामंडलेश्‍वर परशुरामगिरी महाराज

महामंडलेश्‍वर परशुरामगिरी महाराज (उजवीकडे) यांचा पुष्पहार घालून सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्थेचे कार्य संन्यस्तपदाकडे जाण्याचे आहे, असे प्रतिपादन राजस्थान येथील महामंडलेश्‍वर परशुरामगिरी महाराज यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

महामंडलेश्‍वर परशुरामगिरी महाराज पुढे म्हणाले की, सनातन संस्था हिंदूंना जागृत करण्याचे जे कार्य करत आहे, त्याची सध्याच्या काळात पुष्कळ आवश्यकता असून हे कार्य उत्तरोत्तर प्रगतीपथावर जाईल. मला जी आज्ञा असेल, ती सांगा. मी सदैव आपल्यासमवेत आहे. हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगण्याचे आपण कार्य करत आहात. सर्व वर्णियांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. आपण एकमेकांना पूरक आहोत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment