‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी तरुणांना जागृत करण्याचे कार्य सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून होत आहे,’ – महामुनी श्रित: महागत:, नेपाळ

महामुनी श्रित: महागत: यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी) – राष्ट्र आणि धर्म यांसाठी तरुणांना जागृत करण्याचे कार्य सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून होत आहे, असे प्रतिपादन नेपाळ येथील सिरसीमधील दक्षिणेश्‍वर धामाचे महामुनी श्रित: महागत: यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पुष्पहार घालून आणि ‘देवनदी गंगा की रक्षा करें !’ हा हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ उपस्थित होते.

महामुनी श्रित: महागत: पुढे म्हणाले की, सध्याच्या पिढीला सनातन म्हणजे हिंदु धर्माविषयी अधिक माहिती नाही. ही माहिती सनातन संस्थेने ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांतून चांगल्या प्रकारे दिली आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment