हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य लवकर पूर्ण व्हावे ! – स्वामी डॉ. योगानंदगिरी महाराज

स्वामी डॉ. योगानंदगिरी महाराज यांना प्रदर्शन दाखवतांना श्री. सुनील घनवट (उजवीकडे)

प्रयागराज (कुंभनगरी), –  हिंदु जनजागृती समिती तिच्या कार्यात अग्रेसर रहावी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य लवकर पूर्ण व्हावे, असे प्रतिपादन विश्‍वसेना संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी डॉ. योगानंदगिरी महाराज यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षणफलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. ‘सनातन धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी एकजूट होऊन सर्व साधक करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे’, असेही स्वामी या वेळी म्हणाले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा सन्मान केला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट या वेळी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात