सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून सनातन वैदिक धर्माविषयी आपण सर्वांना अवगत करत आहात ! – राजगुरु पू. स्वामी श्री विशोकानंद भारती महाराज, गोविंदमठ, काशी

राजगुरु पू. स्वामी श्री विशोकानंद महाराज (मध्यभागी) यांना हिंदु जनजागृती समितीचे कार्य सांगणारी पुस्तिका भेट देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि उजवीकडे महामंडलेश्‍वर स्वामी चंद्रशेखरानंदगिरी महाराज

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातनचे प्रदर्शन पाहून पुष्कळ आनंद झाला; कारण तुम्ही लोक सनातन वैदिक धर्माचे उत्थान कसे व्हायला हवे, याची लोकांना माहिती कशी होईल, हे सांगण्यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगले प्रयत्न करत आहात. लहान मुले, तरुण, वयस्कर लोक या प्रदर्शनाकडे आकर्षित होऊन ते प्रदर्शनातील माहिती समजूनही घेत आहेत. या प्रदर्शनातून ‘सनातन धर्म काय आहे, वृद्धांची सेवा कशी करायला हवी, गोमातेचे रक्षण कसे करायला हवे, नमस्कार कसा करायला हवा, त्यातून ऊर्जा कशी निर्माण होते’, अशी माहिती देऊन सनातन वैदिक धर्माविषयी आपण सर्वांना अवगत करत आहात, ही चांगली गोष्ट आहे, असे प्रतिपादन काशी येथील गोविंदमठाचे निर्वाणी पीठाधीश्‍वर आचार्य महामंडलेश्‍वर राजगुरु पू. स्वामी श्री विशोकानंद भारती महाराज यांनी येथे केले.

येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत काशी येथील गोविंदमठाचे महामंडलेश्‍वर स्वामी चंद्रशेखरानंदगिरी महाराज उपस्थित होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी राजगुरु पू. स्वामी श्री विशोकानंद भारती महाराज यांना समितीचे कार्य सांगणारी पुस्तिका भेट दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment