सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाजपरिवर्तन होणार ! – महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज

सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाजपरिवर्तन होणार ! – महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाज परिवर्तन होणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील रघुनाथ मंदिर विजय रामधाम खालसा येथील महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या प्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक उपस्थित होते. महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज पुढे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेने लावलेले हे प्रदर्शन पाहून चांगले वाटले. अशाच प्रकारे सनातन धर्माचे रक्षण होऊ शकते. प्रदर्शनात दाखवण्यात आलेले विषय ही वास्तविकता आहे. हिंदु समाजाने हे प्रदर्शन पाहून त्यानुसार कार्य केले, तर समाजात परिवर्तन होईल. कोणी हिंदू ख्रिस्ती पंथ स्वीकारणार नाहीत.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment