हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ सनातन संस्थाच करू शकते ! – श्री. अनिल धीर

श्री. अनिल धीर, संयोजक, ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’, भुवनेश्वर, ओडिशा

‘मी मागील १५ वर्षांपासून सनातन संस्थेशी जोडला गेलेलो आहे. सर्वसामान्यतः प्रत्येक वर्षी मी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात जातो आणि त्यामुळे मला आश्रमाचे चैतन्यही लाभते. मी इतर पुष्कळ संस्थांमध्ये, म्हणजे त्या राष्ट्रवादी संस्था असो, धार्मिक संस्था असो, त्यामध्येही मी माझे थोडेफार योगदान देतो. सर्वसाधारणपणे मागील दीड दशकापासून सनातन संस्थेशी जोडल्यानंतर मला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते की, जर ही दृढ निष्ठा, योग्य प्रेरणा आणि इच्छाशक्ती यांसमवेत हिंदु राष्ट्राची स्थापना जर कुणी करणार असेल, तर ती केवळ सनातन संस्थाच करू शकते.

सनातन संस्थेने घेतलेले ध्येय गाठण्यासाठी जे मार्गक्रमण चालू आहे. ते मी एवढ्या वर्षांपासून पहात आलो आहे. परात्पर गुरुदेवांनी भविष्यात काय होणार आहे ? निकटच्या काळात काय होणार आहे ? मध्यंतरीच्या कालावधीत काय होणार आहे ? दीर्घकाळानंतर काय होणार आहे ? हे जे जे काही सांगितले होते, ते आपण प्रत्यक्ष पहात आहोत. त्यांनी जसे सांगितले तसेच सर्व काही हुबेहूब अनुभवायलाही येत आहे.

श्री. अनिल धीर

१. सनातन संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात वा आश्रमात पुष्कळच सकारात्मक स्पंदने जाणवतात !

सनातन संस्था आणि सर्व साधकांशी जोडल्यानंतर जेवढ्या वेळा मी रामनाथी आश्रमात गेलो किंवा गोव्यात रहातो किंवा कोणत्याही इतर वेगळ्या कार्यक्रमांसाठी जातो, तेव्हा माझ्या मनात एक पुष्कळ चांगली भावना, म्हणजे मनाला एक प्रकारची शांती आणि समाधान वाटते. या संस्थेमुळेच मी अन्य पुष्कळ लोकांशीही जोडला गेलो आहे. त्यांच्याही सनातन संस्थेविषयी अशाच सर्व भावना आहेत. त्यांनाही माझ्यासारखेच अनुभव येतात. जे कार्य सनातन संस्थेने आजपर्यंत केले आहे आणि आताही करत आहे, त्याची आवश्यकता आपल्या देशासह संपूर्ण जगाशी पुष्कळ जोडलेली आहे. सनातन संस्थेच्या कोणत्याही ग्रंथाचे वाचन करा, त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात जा आणि नामजप करा, या सर्वांमधून आपल्याला पुष्कळच सकारात्मक स्पंदने जाणवतात, पुष्कळ सकारात्मक शक्ती मिळते आणि त्यामुळे स्वतःची शुद्धी होत असल्याचे जाणवते. विशेषतः मी पहातो की, सनातन संस्थेत तरुण वर्ग आणि वयस्कर नागरिक आहेत. ते सर्व संस्थेशी एकरूप होऊन गेल्यामुळे संस्थेचे कार्य करण्यात अधिक संतुष्टता आणि पुष्कळ समाधान मिळत असल्याचे दिसून येते.

२. जगाला सावरण्याच्या योगदानात सनातन संस्थेचा वाटा सिंहाचा !

आपल्या देशात आणि जगात जी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या सर्वांचे निराकरण करण्यासाठी काही मर्यादेपर्यंत उपाययोजना काढायची असेल, तर सनातन संस्थेने दाखवलेल्या मार्गदर्शनातूनच काढता येईल. या सर्वांवरून मी असे म्हणतो की, नवीन आदर्श जगाची व्यवस्था (न्यू वर्ल्ड ऑर्डर) करण्याची आवश्यकता आहे. मला संपूर्ण निश्चिती आहे की, आगामी येणार्‍या संकट काळात जगाला सावरण्याच्या योगदानात सनातन संस्थेचा सिंहाचा वाटा असेल.’

३. …भविष्याकडे अग्रेसर व्हायचे आहे !

कोणत्याही संस्थेची जेव्हा २५ वर्षे पूर्ण होतात, म्हणजे त्यांच्या यशस्वी कार्याचा एक महत्त्वाचा मैलाचा दगड पार केलेला असतो. पुढे मार्गक्रमण करतांना आपण मागेही वळून पाहिले, तर आमचे या २५ वर्षांतील जे अनुभव आहेत, त्यातून शिकून भविष्याकडे अग्रेसर व्हायचे आहे. त्यासाठी सनातन संस्था, संस्थेशी जोडलेले सर्व साधक आणि भक्त या सर्वांना माझ्याकडून पुष्कळ शुभेच्छा आहेत. मी परमेश्वराकडे अशीच प्रार्थना करतो, ‘सनातन संस्थेच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांचे मार्गदर्शन आम्हाला भविष्यातही मिळत राहो !’

 

श्री. चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड, बेंगळुरू

हिंदु समाज भक्कम करण्यामध्ये सनातन संस्थेचे योगदान पुष्कळ मोठे !

श्री. चक्रवर्ती सुलीबेले

‘मी महाविद्यालयात शिकत असतांना त्या वेळी सनातन संस्थेचे जे सत्संग होत होते, त्यामध्ये जात होतो. मला हे ऐकून पुष्कळ आश्चर्य वाटते की, ज्या संस्थेच्या सत्संगातून नामजपाविषयी ऐकत होतो, त्या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज सनातन संस्था ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी’ अग्रेसर आहे. समाजातील आणि या देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात असलेल्या सर्व हिंदूंना एकत्रित करून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी सनातन संस्था कार्यरत आहे. त्यासाठी मी सनातन संस्थेचे अंतःकरणापासून आभार मानतो. हिंदु समाज जो काही आज भक्कम झाला आहे, त्यामध्ये सनातन संस्थेचे पुष्कळ मोठे योगदान आहे, एवढेच मी सांगू इच्छितो.’

Leave a Comment