वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ करणारे संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यांसाठी यज्ञ करणारे, समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी आणि गणपतीचे उपासक संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे पुत्र अन् शिष्य श्री. गणेश स्वामी यांच्यासह १३ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.

धर्माचे शास्त्रशुद्ध आचरण करणारे आणि धर्म अन् विज्ञान यांची यथायोग्य सांगड घालणारे सनातनचे साधक

समाजात हिंदुत्ववादी, धर्मप्रचारक, कीर्तनकार, प्रवचनकार, पंडित अशी विविध मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम केले; परंतु धर्माचे शास्त्रशुद्ध आचरण करणारे सनातनचे साधक प्रथमच मी पाहिले.

अमेरिकेतील संशोधक डॉ. श्रीकांत पाटील यांची सनातन आश्रमाला भेट !

अमेरिकेतील ‘त्रिवेदी ग्लोबल इनकॉर्पोरेशन’ (Trivedi Global Inc.,USA) या संस्थेचे संशोधन विभागाचे संचालक (‘डायरेक्टर रिसर्च’) डॉ. श्रीकांत पाटील यांनी सनातन आश्रमाला भेट दिली.

श्री अधिचंचुनगिरी महासंस्थान मठाचे पिठाधिपती प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांचे सनातनला आशीर्वाद !

श्री अधिचंचुनगिरी महासंस्थान मठाचे पिठाधिपती प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांची सनातन संस्थेच्या साधकांनी भेट घेतली असता त्यांनी माझे सनातनला आशीर्वाद आहेत, असे उद्गार काढले.

मानवकल्याणासाठी सनातन संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय ! – स्वामी श्री सुकचरानन्दजी, शिवसेना, उत्तर प्रदेश

हिंदु धर्मावरील आघात रोखून सनातन संस्था सनातन हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. मानवकल्याणासाठी होत असलेले हे कार्य प्रशंसनीय आहे.

कोल्लूर येथील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

येथील मुकांबिका मंदिरातील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद हे नुकतेच चेन्नई येथे आले होते. त्या वेळी सनातनच्या स्थानिक साधकांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

स्वामी श्री विवेकानन्द सरस्वती यांचे सनातनच्या कार्याला शुभाशीर्वाद !

संस्था आणि समितीच्या कार्याला शुभाशीर्वाद देतांना स्वामी म्हणाले, द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ आणि ज्ञानयज्ञ आदी सर्व सूत्रांना सोबत घेऊन सनातन संस्थेचे कार्य चालू आहे.

तंजावर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांचे सनातनला आशीर्वाद

तंजावर, तमिळनाडू येथील ७८ वर्षीय संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांनी वर्ष १९६१ पासून त्यांचे गुरु प.पू. राम नंदेन्द्र सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ करायला आरंभ केला…

संत प.पू. सद्गुरु नानामहाराज सोनईकर यांची सनातन आश्रमाला भेट !

प.पू. सद्गुरु नानामहाराज सोनर्इकर यांनी काढलेले गौरवोद्गार, ‘तमसो मा ज्योतिर्गमय या वचनाप्रमाणे सनातनच्या या आश्रमात आल्यानंतर मन आनंदमय होऊन अंतर्लहरी निर्माण झाल्या…

ईश्‍वरी अधिष्ठान असल्यानेच सनातन संस्थेचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण ! – पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते

सनातनविषयी त्यांनी काढलेले गौरवोद्गार – ‘सनातनचा आश्रम म्हणजे ऋषिमुनींचा आश्रम आहे. प्रत्येक साधकाचे वागणे, बोलणे, सेवा करणे धर्मशास्त्राला धरून आहे…