धर्मशिक्षण प्रदर्शनातून सर्वांना सकारात्मक ऊर्जा मिळते ! – आचार्य हेमेंद्र प्रसाद, स्वामीनारायण संप्रदाय, गुजरात

आचार्य हेमेंद्र प्रसाद (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी), ४ फेब्रुवारी (वार्ता.) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावलेल्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून सर्वांना सकारात्मक ऊर्जा मिळते. ती सर्वांनी घेतली पाहिजे. हे प्रदर्शन लहानांपासून ज्येेष्ठ नागरिक अशा सर्वांनी पहाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे आचार्य हेमेंद्र प्रसाद यांनी १ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरीत लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना त्यांनी भेट दिल्यावर वरील उद्गार काढले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी आचार्य हेमेंद्र प्रसाद यांचा हार घालून आणि ‘श्री गंगाजी की महिमा’ हा हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ग्रंथ देऊन सन्मान केला.

ईश्‍वर आपल्या गुरुजींना निरोगी ठेवो आणि
त्यांचे अनुसंधान तुम्हा साधकांना मिळो ! – आचार्य हेमेंद्र प्रसाद

या प्रसंगी आचार्य हेमेंद्र प्रसाद म्हणाले, ‘जीवनाचे ध्येय गुरुप्राप्ती असते. ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम्’, हेच मी येथे येऊन पहात आहे. येथील सर्व साधकांमध्ये गुरूंप्रती आदरभाव असून त्यांच्यात विनम्रता आणि प्रेमभाव आहे. ईश्‍वर आपल्या गुरुजींना निरोगी ठेवो आणि त्यांचे अनुसंधान तुम्हा साधकांना मिळून तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत’, असा आशीर्वाद आचार्य हेमेंद्र प्रसाद यांनी या वेळी दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment