सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याप्रमाणे सर्व संतांनी कार्य करायला हवे ! – स्वामी भास्करतीर्थ महाराज, महामंत्री, अखिल भारतीय संत समिती, ओडिशा

स्वामी भास्करतीर्थ महाराज यांचा पुष्पहार घालून सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी), ४ फेब्रुवारी (वार्ता.) – माता गंगा नदीच्या किनारी हिंदूंचे रक्षण आणि जागृती यांसाठी हे प्रदर्शन लावले आहे. अनेक संकटे आली, तरी तुम्ही हिंदु धर्माची परंपरा आणि हिंदू यांच्यासाठी कार्य करत आहात. सर्व संतांनी असे कार्य करायला हवे. सध्या भारतात आदिवासी भागांतील आणि इतर ठिकाणचे हिंदू हे ख्रिस्ती होत आहेत. त्यांना धर्मांतरापासून रोखण्याचे दायित्व संत आणि भाविक यांच्यावर आहे. आपल्या गरीब आणि अशिक्षित हिंदु भावाला ख्रिस्ती धर्मांतरापासून परावृत्त करून त्याला आपल्याकडे आणण्याचा विचार या प्रदर्शनातून देण्यात आला आहे. हे प्रदर्शन पाहून आपल्या गावी जाणारा हिंदु इतरांना प्रदर्शनातील माहिती शिकवेल, तो हिंदु धर्माच्या रक्षणासाठी काम करेल आणि हेच महान कार्य होईल, असे प्रतिपादन ओडिशा येथील अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी भास्करतीर्थ महाराज यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

कुंभनगरी येथे सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी स्वामी भास्करतीर्थ महाराज यांचा सन्मान करून त्यांना समितीपुरस्कृत ‘देवनदी गंगाकी रक्षा करे !’ हा ग्रंथ भेट दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment