सनातनचे ग्रंथप्रदर्शन सर्वत्र लावल्यास देशात धर्माचा अधिक प्रचार होईल ! – श्री स्वामी सत्यप्रसाददासजी महाराज, श्री स्वामीनारायण संप्रदाय, गुजरात

१. श्री स्वामी सत्यप्रसाददासजी महाराज यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती देतांना कु. कृतिका खत्री

प्रयागराज (कुंभनगरी), ४ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातनचे ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर मला पुष्कळ चांगले वाटले. या प्रदर्शनातून पुष्कळ ज्ञान मिळते. सध्या लहान मुले आणि तरुण पिढी यांना आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती नाही, ती या प्रदर्शनातून मिळू शकेल. या प्रदर्शनातील माहिती आणि सूचना वाचल्यानंतर तरुण पिढीच्या लक्षात येईल की, वास्तवात देशात काय आहे ? त्यांना चांगले वाटून जीवनात पुढे जाण्याची संधी मिळेल. आपला धर्म, परंपरा आणि संस्कृती पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे, यासाठी हे प्रदर्शन पहाणे आवश्यक आहे. असेच प्रदर्शन आपण सर्वत्र लावले, तर देशात आपण धर्माचा अधिक प्रचार करू शकतो, असे प्रतिपादन गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील भूजचे श्री स्वामी सत्यप्रसाददासजी महाराज यांनी येथे काढले.

श्री स्वामी सत्यप्रसाददासजी महाराज हे श्री रामानुज वैष्णव परंपरेतील श्री स्वामी नारायण संप्रदायाचे आहेत. १ फेब्रुवारी या दिवशी कुंभनगरीतील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत स्वामी श्री जी स्वरूपदासजी महाराजही उपस्थित होते. या प्रसंगी सनातनच्या साधिका कु. कृतिका खत्री यांनी दोघांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment