प्रस्तूत लेखात गुरुपूजनाचा विधी दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास गुरुपूजन अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होते. यानुसार श्री गुरुपूजन करून सर्व साधक, शिष्य आदींवर गुरुकृपा व्हावी, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना !
पूजनाचा पहिला भाग, ‘गुरुपौर्णिमा पूजाविधी (अर्थासह) (भाग १)’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा !
कलशपूजन
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।।
(हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी (नद्यांनो) या पाण्यामध्ये वास करा.)
कलशाय नमः ।
(कलशाला नमस्कार करतो.)
कलशे गङ्गादितीर्थान् आवाहयामि ।
(या कलशामध्ये गंगादितीर्थांचे आवाहन करतो.)
कलशदेवताभ्यो नमः ।
(कलशदेवतेला नमस्कार करतो.)
सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।
(सर्व पूजेसाठी गंध, फूल आणि अक्षता अर्पण करतो.)
(कलशावर गंध, फूल आणि अक्षता वाहाव्यात.)
घंटापूजन
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् ।
कुर्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।।
(देवांच्या आगमनासाठी आणि राक्षसांच्या जाण्यासाठी देवतांना आवाहनस्वरूप घंटानाद करत आहे.)
घण्टायै नमः ।
(घंटेला नमस्कार असो.)
सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।
(सर्व पूजेसाठी गंध, फूल आणि अक्षता अर्पण करतो.)
(घंटेला गंध, फूल आणि अक्षता वाहाव्यात.)
दीपपूजन
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः ।
आरोग्यं देहि पुत्रांश्च मत: शान्तिं प्रयच्छ मे ।।
(हे दिव्या, तू ब्रह्मस्वरूप आहेस. ज्योतिषांचा अचल स्वामी आहेस. (तू) आम्हाला आरोग्य दे, पुत्र दे, बुद्धी दे आणि शांती दे.)
दीपदेवताभ्यो नमः ।
(दीपदेवतेला नमस्कार करतो.)
सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि ।
(सर्व पूजेसाठी गंध, फूल आणि अक्षता अर्पण करतो.)
(समईला गंध, फूल आणि अक्षता वाहाव्यात.)
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा ।
यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ।।
((अंतर्-बाह्य) स्वच्छ असो वा अस्वच्छ असो, कोणत्याही अवस्थेत असो. जो (मनुष्य) कमलनयन (श्रीविष्णूचे) स्मरण करतो, तो आतून आणि बाहेरून शुद्ध होतो.)
(या मंत्राने तुळशीपत्र पाण्यात भिजवून पूजासाहित्यावर आणि आपल्या अंगावर पाणी प्रोक्षण करावे.)
यानंतर सद्गुरूंचे ध्यान करावे.
अथ ध्यानं –
(आता मी (सद्गुरूंचे) ध्यान करतो.)
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।।
(ब्रह्मरूप, आनंदरूप, परमोच्च सुख देणारे, केवळ ज्ञानस्वरूप, द्वन्द्वरहित, आकाशाप्रमाणे (निराकार), ‘तत्त्वमसि’ वाक्याचे लक्ष्य (ते तू आहेस, असे वेदवाक्य ज्याला उद्देशून आहे ते), एकच एक, नित्य, शुद्ध, स्थिर, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, भावातीत, गुणातीत असलेल्या अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो.)
श्री सद्गुरुभ्यो नमः । ध्यायामि ।
(श्री सद्गुरूंना नमन करून मी ध्यान करतो.)
(गुरुपूजनात पुढील १५ उपचार आहेत, त्यातील ३ ते ६ या उपचारांच्या वेळी हातावर पाणी घेऊन ते गुरूंच्या छायाचित्रावर न वहाता, ‘प्रत्यक्षात श्री सद्गुरु समोर बसलेले आहेत आणि त्यांच्या चरणांवर पाणी वहात आहोत’, असा भाव ठेवून ते पाणी ताह्मणामध्ये सोडावे.)
यानंतर प्रत्येक उपचाराच्या वेळी खालील मंत्र म्हणून सद्गुरूंची पूजा करावी.
नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नम: परेभ्य: परपादुकाभ्य: ।
आचार्यसिद्धेश्वरपादुकाभ्यो नमोऽस्तु लक्ष्मीपतिपादुकाभ्य: ।।
(गुरूंना नमस्कार करतो. गुरूंच्या पादुकांना नमस्कार करतो. परेतील गुरूंना (परात्परगुरूंना) नमस्कार करतो. परात्परगुरूंच्या पादुकांना नमस्कार करतो. ईश्वरप्राप्ती झालेल्या आचार्यांच्या पादुकांना नमस्कार करतो. लक्ष्मीपती श्रीविष्णूच्या पादुकांना नमस्कार करतो.)
१. श्री सद्गुरुभ्यो नम: । आवाहयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून आवाहन करतो.)
(सद्गुरूंना मनाने आवाहन करावे.)
२. श्री सद्गुरुभ्यो नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून आसनाप्रती अक्षता अर्पण करतो.)
(अक्षता प्रतिमेवर वाहाव्यात.)
३. श्री सद्गुरुभ्यो नम: । पाद्यं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून पाय धुण्यासाठी पाणी अर्पण करतो.)
(ताम्हणात पाणी सोडावे.)
४. श्री सद्गुरुभ्यो नम: । अर्घ्यं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून अर्घ्यासाठी पाणी अर्पण करतो.)
(ताम्हणात पाणी सोडावे.)
५. श्री सद्गुरुभ्यो नम: । आचमनीयं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून आचमनासाठी पाणी अर्पण करतो.)
(ताम्हणात पाणी सोडावे.)
६. श्री सद्गुरुभ्यो नम: । स्नानं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून स्नानासाठी पाणी अर्पण करतो.)
(ताम्हणात पाणी सोडावे.)
७. श्री सद्गुरुभ्यो नम: । वस्त्रं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून वस्त्र अर्पण करतो.)
(वस्त्र अर्पण करावे.)
८. श्री सद्गुरुभ्यो नमः । उपवीतं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून उपवीत अर्पण करतो.)
(जानवे किंवा अक्षता अर्पण कराव्यात आणि हात जोडावे.)
९. श्री सद्गुरुभ्यो नमः । चन्दनं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून गंध अर्पण करतो.)
(गुरूंच्या चरणांवर गंध-फूल वाहावे.)
१०. श्री सद्गुरुभ्यो नमः । मङ्गलार्थे कुङ्कुमं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून मंगल म्हणून कुंकू अर्पण करतो.)
(कुंकू लावावे.)
११. श्री सद्गुरुभ्यो नमः । अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून अलंकार म्हणून अक्षता अर्पण करतो.)
(अक्षता वाहाव्यात.)
१२. श्री सद्गुरुभ्यो नमः । पूजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून सध्याच्या ऋतूत फुलणारी फुले अर्पण करतो.)
(फुले अर्पण करावी आणि हार घालावा.)
१३. श्री सद्गुरुभ्यो नमः । धूपं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून धूप अर्पण करतो.)
(गुरूंना उदबत्ती ओवाळावी.)
१४. श्री सद्गुरुभ्यो नमः । दीपं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून दीप ओवाळतो.)
(गुरूंना निरांजन ओवाळावे.)
१५. श्री सद्गुरुभ्यो नमः । नैवेद्यार्थे पुरतस्थापितनैवेद्यं निवेदयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून पुढे ठेवलेला नैवेद्य निवेदन करतो.)
(हातात तुळशीचे पान घेऊन पाण्यात बुडवून त्याने नैवेद्यावर पाणी प्रोक्षण करावे आणि डावा हात छातीवर ठेवून नैवेद्य दाखवावा.)
यानंतर पुढील मंत्र म्हणावेत –
प्राणाय स्वाहा ।
(हे प्राणासाठी अर्पण करत आहे.)
अपानाय स्वाहा ।
(हे अपानासाठी अर्पण करत आहे.)
व्यानाय स्वाहा ।
(हे व्यानासाठी अर्पण करत आहे.)
उदानाय स्वाहा ।
(हे उदानासाठी अर्पण करत आहे.)
समानाय स्वाहा ।
(हे समानासाठी अर्पण करत आहे.)
ब्रह्मणे स्वाहा ।
(हे ब्रह्माला अर्पण करत आहे.)
श्री सद्गुरुभ्यो नमः । नैवेद्यं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून नैवेद्य अर्पण करतो.)
मध्ये पानीयं समर्पयामि ।
(मध्ये पिण्यासाठी पाणी अर्पण करत आहे.)
उत्तरापोशनं समर्पयामि ।
(आपोशनासाठी पाणी अर्पण करत आहे.)
हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
(हात धुण्यासाठी पाणी अर्पण करत आहे.)
मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
(तोंड धुण्यासाठी पाणी अर्पण करत आहे.)
करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।
(हाताला लावण्यासाठी चंदन अर्पण करत आहे.)
मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि ।
(मुखवासासाठी पान-सुपारी अर्पण करत आहे.)
(‘समर्पयामि’ म्हणतांना पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
आता आपण सद्गुरूंची आरती करूया !
श्री सद्गुरुभ्यो नमः । मङ्गलार्तिक्यदीपं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून मंगलारती अर्पण करतो.)
आरती
‘ज्योतसे ज्योत जगाओ ।’ किंवा परंपरेनुसार गुरूंची अन्य आरती म्हणावी.
(मंगलारती ओवाळावी.)
श्री सद्गुरुभ्यो नमः । कर्पूरदीपं समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून कापराची आरती ओवाळतो.)
(कापराची आरती ओवाळावी.)
श्री सद्गुरुभ्यो नमः । नमस्कारान् समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करतो.)
(सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घालावा.)
श्री सद्गुरुभ्यो नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पण करतो.)
(घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने, म्हणजे डावीकडून उजवीकडे वर्तुळाकार फिरत स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.)
श्री सद्गुरुभ्यो नमः । प्रार्थनां समर्पयामि ।
(श्री सद्गुरूंना नमस्कार करून प्रार्थना अर्पण करतो.)
(हात जोडून प्रार्थना करावी.)
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
(हे परमेश्वरा, मी ‘तुला आवाहन कसे करावे, तुझी उपासना कशी करावी, तुझी पूजा कशी करावी’, हे जाणत नाही. त्यामुळे तू मला क्षमा कर.)
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
(हे देवेश्वरा, मंत्र, क्रिया अथवा भक्ती काहीच नसलेल्या अशा मी केलेली तुझी पूजा तू परिपूर्ण मानून घे.)
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै सद्गुरवे इति समर्पये तत् ।।
(हे गुरुदेवा, शरिराने, वाणीने, मनाने, (इतर) इंद्रियांनी, बुद्धीने, आत्म्याने अथवा प्रकृतीस्वभावानुसार जे जे मी करतो, ते ते मी तुम्हाला अर्पण करत आहे.)
अनेन कृतपूजनेन श्रीसद्गुरुः प्रीयताम् ।
(या केलेल्या पूजनाने सद्गुरु प्रसन्न होवोत.)
(असे म्हणून उजव्या हातावर पाणी घेऊन सोडावे आणि दोन वेळा आचमन करावे.)
कृतज्ञता
श्री गुरूंच्या कृपेने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून थांबूया.
गुरुपूजन झाल्यानंतर विसर्जनाच्या वेळी पुढील श्लोक म्हणावा.
यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
(पूजा स्वीकारून सर्व देव इष्टकामसिद्धीसाठी पुन: येण्यासाठी आपापल्या स्थानी जावोत.)
श्री गणपतिपूजन केलेल्या नारळावर अक्षता वाहून श्री गणपतीचे विसर्जन करावे.
ABP news, सनातन संस्था के विषय में भ्रम फैला रही है । मैंने पहली बार संस्था के लोंगों के दर्शन किए हैं । देवतुल्य लग रहे है संस्था के सदस्य l