रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

१. नरेंद्र, श्रीमाता निवास, दर्गा रस्त्याजवळ, किन्निकंबळ पोस्ट, मंगळुरू.

‘मी सनातनच्या रामनाथी आश्रमाला दिलेली भेट, हे माझ्या कोणत्या जन्मातील पुण्याचे फळ आहे’, हे मला ठाऊक नाही. सर्वकाही गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे झाले आहे. मी आश्रमाला दिलेली भेट माझ्या साधनेचे फळ असू शकते. माझे ध्येय हिंदु राष्ट्र आहे. मला आश्रमात चांगली माहिती सांगितली. माझे सर्वांना धन्यवाद !’

(३१.१०.२०२१)

२. श्री. गौरव मनोहर पाटील, शिंगटेनगर, हिरापूर रोड, चाळीसगाव, जिल्हा जळगाव.

अ. ‘सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्वच्छता फार उत्कृष्ट आहे. आश्रमातील चित्रीकरण कक्षाची कल्पना पुष्कळ छान होती. आश्रमाच्या स्वयंपाकघरातील वातावरण आणि सेवा करणार्‍या साधकांकडे बघून पुष्कळ आनंद झाला.

आ. साधना करणार्‍या साधकांकडे पाहून पुष्कळ चांगले वाटले.

इ. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून : सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन चांगले आहे. ते पाहून ‘दैवी शक्ती कोणती आणि राक्षसी शक्ती कोणती ?’, हे माझ्या लक्षात आले. त्याकडे बघून चांगली प्रेरणा मिळाली.’

(१०.११.२०२१)

३. श्री. सुनील गुप्ता, नोएडा (उत्तर प्रदेश)

अ. ‘सनातन आश्रम अतिशय सुंदर आणि अद्वितीय आहे.

आ. सनातन धर्माला उजाळा देण्यासाठी येथे होत असलेले भगीरथ प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत.

इ. अखंड भारताच्या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपले योगदान अप्रतिम आहे.’

(६.१.२०२२)

३. श्री. कालुराम चौधरी, कुंडई, गोवा.

अ. माझ्या मनात ‘आध्यात्मिक आणि देवकार्य’ यासाठी समर्पित होण्याची इच्छा झाली.

आ. ‘येथेच खरे हिंदुत्व जागृत असलेला समाज आहे’, असे वाटले.

इ. आश्रमात ईश्वरप्राप्ती होण्यासाठी पुष्कळ चांगले कार्य चालले आहे.’

(२७.२.२०२२)

४. श्रीमती मीनाक्षी गुप्ता, ग्रीनस सर्वे पार्क, कोलकाता.

अ. ‘मी आश्रमात आल्यानंतर माझे मन शांत झाले.

आ. आश्रमात असेपर्यंत मला वेळेचे भान राहिले नाही.

इ. साधकांमधील नम्रता, भक्ती आणि ते करत असलेली सेवा पाहून माझे मन श्रद्धेने भरून आले.’

(१७.३.२०२२)

५. श्रीमती अनुमा गुप्ता, मुरादाबाद, उत्तरप्रदेश.

अ. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला अवर्णनीय आनंद अनुभवता आला.

आ. सर्व साधकांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ साधेपणा आणि शांती पाहून मला पुष्कळ चांगले वाटले.

इ. सूक्ष्म जगतासंबंधीचे प्रदर्शन पाहिल्यावर

सूक्ष्म जगतासंबंधीचे प्रदर्शन पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्या मनात साधना करण्याची इच्छा जागृत झाली.’

(४.९.२०२२)

 

Leave a Comment