परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागणार्‍या पुणे येथील पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी (वय ८० वर्षे) !

पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी

 

१. परेच्छेने वागणे

‘पू. जोशीआजी यांनी कधीही जोशीआजोबांना ‘हे असे का ? हे कसे ?’, असे प्रश्न कधीही विचारले नाहीत. जोशीआजोबा मला नेहमी सांगायचे की, ‘हिला (पू. जोशीआजींना) काहीही सांगितले, तरी ती काहीच बोलत नाही, हिला काहीच वाटत नाही. ती कधीही प्रतिप्रश्न विचारत नाही. सांगेल तेवढे करत रहाते.’

आजींची प्रगती झाल्यावर ‘त्या नेहमी परेच्छेने वागायच्या; म्हणून देवाने त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले आणि त्यांची साधनेत प्रगती झाली’, हे माझ्या लक्षात आले.

 

२. ईश्वरेच्छेने वागणे

जोशीआजोबा यांच्या मृत्यूनंतर पू. आजींनी सर्व परिस्थिती ‘ईश्वरेच्छा’ म्हणून स्वीकारली. जोशीआजोबा असतांना पू. आजी विनाकारण आजोबांना सोडून इतरत्र राहिल्या नाहीत. आजोबांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांनी ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।’ हे प्रत्यक्ष कृतीतून केले. वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांनी अखंड ईश्वराच्या अनुसंधानात राहून ईश्वरेच्छेने जे होईल, त्या परिस्थितीत आनंदी रहाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या संतपदी विराजमान झाल्या.

परात्पर गुरुमाऊलींनी मार्गदर्शनात ‘ईश्वराशी एकरूप होण्यासाठी दोनच पावले महत्त्वाची एक परेच्छा आणि दुसरे ईश्वरेच्छा’, असे सांगितले आहे. ‘पू. जोशीआजी यांना कानाने अल्प ऐकू येते; पण त्या अंतर्मनाने ईश्वराचे ऐकून त्याचे आज्ञापालन करतात आणि त्यामुळेच त्यांची अध्यात्मात शीघ्र उन्नती होत आहे’, हे लक्षात येते.’

– श्रीमती वंदना करचे, पुणे (१६.७.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment