वात्सल्यभावाने साधकांना मार्गदर्शन करणार्‍या आणि त्यांना भावसागरात डुंबवणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव !

पू. (सौ.) संगीता जाधव

 

१. वात्सल्यभाव

अ. ‘पू. (सौ.) संगीता जाधवकाकू मला बोलवत असतांना ‘आई मला कुशीत घेण्यासाठी बोलावत आहे’, असे वाटते.’

– सौ. सुशीला होनमोरे, बोईसर, मुंबई.

आ. ‘पू. काकूंनी (पू. (सौ.) संगीता जाधव यांनी) त्यांच्या नावाप्रमाणे आम्हाला प्रेमळ आणि मधुर स्वरात साधनेसंदर्भात सतत मार्गदर्शन करून आम्हा साधकांच्या जीवनात संगीतमय वातावरण निर्माण केले आहे.

इ. पू. जाधवकाकूंना आम्ही कधीही रागावलेले पाहिले नाही. त्या सतत हसतमुख असतात.’

– सौ. स्मिता गंगाधर तांडेल, अंधेरी, मुंबई.

 

२. ‘साधकांची साधना व्हावी’ अशी तळमळ

२ अ. साधकांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवणे

साधकांनी चुका केल्या किंवा साधनेच्या संदर्भात चालढकलपणा केला, तरीही त्या न रागावता साधकांच्या मनावर सतत साधनेचे महत्त्व बिंबवतात.

२ आ. साधकाला त्याची चूक प्रेमाने सांगणे

एखाद्या साधकाची चूक झाल्यास पू. काकू ‘तो कुठे चुकला’, हे प्रेमाने सांगून त्याला गुरुदेवांची क्षमा मागायला सांगतात.

२ इ. साधनेसाठी मार्गदर्शन करणे

त्यांना ‘साधक अध्यात्मात पुढे कसे जातील’, अशी तळमळ असते. त्या साधकांना ‘गुरुदेवांची कृपा कशी संपादन करायची ?’, याविषयी सांगतात. त्यांचे मार्गदर्शन ऐकून साधक मनाची मरगळ झटकून पुन्हा उत्साहाने सेवा करतात.

२ ई. भावाचे प्रयत्न करवून घेणे

त्यांनी अनेक वेळा आमच्याकडून भावजागृतीचे प्रयत्न करवून घेऊन आम्हाला सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांच्या दर्शनाचा लाभ मिळवून दिला आहे.’

– सौ. स्मिता गंगाधर तांडेल, अंधेरी, मुंबई

 

३. साधकांसमोर संतसेवेचा आदर्श ठेवणे

अ. ‘पू. जाधवकाकू सद्गुरु अनुताईंसमवेत (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या समवेत) सावलीसारख्या रहातात.

आ. ‘सद्गुरु अनुताईंच्या छत्रछायेखाली पू. जाधवकाकू स्वतःला घडवत आहेत’, असे लक्षात येते.

इ. पू. जाधवकाकू आम्हाला ‘सद्गुरु अनुताईंची कृपा कशी संपादन करायची ? त्यांच्या सत्संगाचा लाभ कसा करून घ्यायचा ?’, हे स्वतःच्या आचरणातून दाखवून देतात.’

– सौ. सुशीला होनमोरे

ई. ‘पू. काकू आणि सद्गुरु अनुताई या दोघींनी ‘आध्यात्मिक मैत्रिणी’ म्हणून आमच्यासमोर आदर्श ठेवला आहे.

 

४. श्रद्धा

पू. काकूंना आध्यात्मिक त्रास असूनही त्या आम्हाला तसे जाणवू देत नाहीत. परात्पर गुरुदेवांवरील अपार श्रद्धेमुळेच त्या त्रास सहन करू शकतात.’

– सौ. स्मिता गंगाधर तांडेल

 

५. भाव

अ. ‘पू. काकूंना तीव्र त्रास होत असतांनाही त्या सतत भावावस्थेत रहाण्याचा प्रयत्न करतात.

आ. पू. काकूंच्या आचरणातून परात्पर गुरुदेवांप्रतीच्या भावाचे दर्शन घडतेे.

इ. ‘पू. काकूंकडून परात्पर गुरुदेवांची स्तुती ऐकावी आणि ती ऐकतच रहावी’, असे वाटते.’

– सौ. सुशीला होनमोरे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात