श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील किरणोत्सवाचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

प्रतिवर्षी कार्तिक मासात साधारणपणे ९, १० आणि ११ नोव्हेंबर असे तीन दिवस, तसेच माघ मासात ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी असे तीन दिवस श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात देवीचा किरणोत्सव साजरा होतो. या किरणोत्सवाचे कलेले सूक्ष्म-परीक्षण आणि सूक्ष्म-चित्रे या लेखात पाहूया.

 

१. किरणोत्सवाच्या तीन दिवसांतील सूर्यकिरणांची स्थिती

पहिला दिवस

सूर्यदेवाचे किरण देवीच्या चरणांना स्पर्श करतात

दुसरा दिवस

सूर्याचे किरण देवीच्या मध्यभागावर येतात

तिसरा दिवस

सूर्याचे किरण देवीच्या मुखमंडलासह संपूर्ण मूर्तीला प्रकाशात न्हाऊन काढतात

 

२. उत्सवाचे स्वरुप

किरणोत्सवाच्या प्रसंगी देवीची सालंकृत पूजा केलेली असते. सूर्यकिरणांनी मूर्तीला स्पर्श करण्याच्या आधी सर्व विद्युत दीप मालवून गाभार्‍यात केवळ दोन समया तेवत ठेवल्या जातात. काही मिनिटांनंतर सूर्यकिरण गेल्यावर देवीची कर्पूरारती, तसेच देवळात घंटानाद केला जातो.

 

३. श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवाचे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातून केलेले सूक्ष्म-परीक्षण

९.११.२००७ या दिवशी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास प्रारंभ झाला. या उत्सवातील पहिल्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी सूर्याचे किरण देवीच्या चरणांवर पडतात. या घटनेचे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातून दोन साधिकांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण आणि त्या वेळी जाणवलेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे. यामध्ये काही सूक्ष्म-चित्रांचाही समावेश आहे.

सूक्ष्म-चित्रे आणि ‘सूक्ष्म-परीक्षणे’ देण्याची कारणे आपण स्थुलातून एखादी कृती केल्यावर त्या कृतीचा सूक्ष्मातून काय परिणाम होतो, हे कळण्याची क्षमता बहुतांश व्यक्‍तींमध्ये नसते. सूक्ष्मातील परिणाम कळल्यावर स्थुलातील कृतीविषयी श्रद्धा निर्माण होते. तसेच सूक्ष्म-चित्रे आणि परीक्षणे यांमुळे तात्त्विक ज्ञानातील कठीण भाग समजायलाही सोपा होतो. यासाठीच सनातनच्या ग्रंथांत, तसेच या संकेतस्थळावरही ‘सूक्ष्म-चित्रे’ आणि ‘सूक्ष्म-परीक्षणे’ प्रसिद्ध करण्यात येतात.

 

३ अ. कु. प्रियांका लोटलीकर यांनी केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

१. सूर्य हे तेजतत्त्वाचे प्रकट स्वरूप आणि कोल्हापूरची श्री महालक्ष्मीदेवी ही शक्‍तीच्या कार्यरत स्वरूपातील सगुण तत्त्व असल्याचे जाणवणे

अ. ‘सूर्य हे तेजतत्त्वाचे प्रकट स्वरूप दर्शवते. त्यामुळे सूर्याच्या तेजोमय किरणांतून तेजतत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे जाणवते.

आ. कोल्हापूरची श्री महालक्ष्मीदेवी ही शक्‍तीच्या कार्यरत स्वरूपातील सगुण तत्त्व असल्याचे जाणवले.

 

२. तेजतत्त्व आणि कार्यरत प्रकट शक्‍ती यांच्या मीलनातून वातावरण चैतन्यमय होऊन वायूमंडलात शक्‍तीच्या लहरी अन् वाईट शक्‍तींनी निर्माण केलेले काळ्या शक्‍तीचे दाट थर यांचे युद्ध होणे

अ. तेजतत्त्व आणि कार्यरत प्रकट शक्‍ती यांच्या मीलनातून वातावरण चैतन्यमय होऊन वायूमंडलात शक्‍तीच्या लहरी प्रक्षेपित झाल्या. तेव्हा या शक्‍तीत्मक लहरी अन् वाईट शक्‍तींनी निर्माण केलेले काळ्या शक्‍तीचे दाट थर यांचे युद्ध चालू असल्याचे मला जाणवत होते.

आ. वातावरणात ऊर्जात्मक लहरी संक्रमित होत असल्याचे मला जाणवत होते.

इ. जवळजवळ एक घंट्याने (तासाने) वातावरणातील युद्धाचा स्तर उणावून वातावरण चैतन्यमय होऊन उत्साहाला भरते येत असल्याचे जाणवत होते.

 

३. देवीच्या सगुण रूपाचे दर्शन होणे, तिचे तेज पाहून डोळे दिपणे आणि भावजागृती होणे

अ. मला देवीचे सगुण रूप दिसू लागले. देवीची मनोहर मूर्ती माझ्या डोळ्यांत भरली होती. तिचे तेज पाहून माझे डोळे दिपून जात होते. (सूक्ष्मातूनही देवीचे दर्शन कसे घेता येते, हे यावरून लक्षात येईल. – संकलक)

आ. नंतर मी देवीचा एक-एक अवयव न्याहाळत असतांना माझी भावजागृती होत होती.

इ. काही क्षणांत सूर्यकिरणांच्या ठिकाणी मीच देवीच्या चरणांवर माझे मस्तक ठेवत असल्याचे मला जाणवले.’

 

३ आ. सौ. अंजली गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

१. सूक्ष्म-चित्र

२. पूर्वीच्या काळी ईश्‍वरेच्छेनेच देवळे बांधली जाणे

‘श्री महालक्ष्मीदेवीचे देऊळ हेमाडपंथी असून ते सातव्या शतकात बांधलेले आहे. पूर्वी देऊळ बांधणीत देवता साक्षात्कार रूपात भक्‍तांना दर्शन देऊन देऊळ कसे बांधायचे, या संदर्भात मार्गदर्शन करत आणि देवतेचे आसनपीठ कुठे असावे, याविषयी ज्ञान देत असत. त्यामुळे देवळे ही सर्वस्वी ईश्‍वरेच्छेनेच बांधली जात.

 

३. देवळांचे वैशिष्ट्य

ईश्‍वरेच्छेने देवळे बांधली गेल्याने या देवळांची जडणघडण स्थळदर्शक भानातून सर्वस्वी काळचक्राला अनुसरून अशी कार्याच्या अनुषंगाने झालेली असे.

 

४. श्री महालक्ष्मीदेवीचे देऊळ हे सृष्टीतील प्रत्येक कार्यकारी कालचक्रवाचक घडामोडींचे साक्षीदार असणे

श्री महालक्ष्मीदेवीचे देऊळ हेही असेच काळचक्राला अनुसरून योग्य स्थळदर्शक आकृतीबंधातून साकार झालेले असल्याने ते सृष्टीतील प्रत्येक कार्यकारी कालचक्रवाचक घडामोडींचे साक्षीदार बनलेले आहे.

 

४ अ. ‘साक्षीदार’ या शब्दाची व्याख्या

साक्षात्काराच्या रूपात घटनाक्रम जाणणार्‍या प्रगल्भ जिवासच ‘साक्षीदार’ असे संबोधले जाते. हाच साक्षीदार प्रत्येक दर्श घटनेचे सखोलरित्या विवरण करू शकतो.

 

५. देवळाच्या जडणघडणीने सूर्यमंडलात फिरणार्‍या तेजलहरींना काळाप्रमाणे आपल्याकडे खेचून घेऊन मूर्तीतील देवत्वाला जागृत ठेवणे

या देवळाची जडणघडण ही देवळातून प्रक्षेपित होणार्‍या आकर्षणयुक्‍त स्थळविषयक कार्यलहरीयुक्‍त आकर्षणबंधातून सूर्यमंडलात फिरणार्‍या तेजलहरींना त्या त्या काळाप्रमाणे आपल्याकडे खेचून घेऊन मूर्तस्वरूपात बद्ध करून देवीच्या मूर्तीतील देवत्व नैसर्गिकरित्या तेजोमयलहरींच्या स्पर्शाने जागृत ठेवत आहे.

 

६. पूर्वीच्या काळी देवता नवसाला, म्हणजेच भक्‍ताच्या प्रत्येक इच्छेला पावणार्‍या किंवा प्रत्येक इच्छा पूर्णत्वास नेणार्‍या असत, याचे कारण

पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने सूर्यमंडलातील नैसर्गिक तेजोमय लहरींच्या कार्यकारीदर्शक स्पर्शातूनच देवतेच्या मूर्तीतील तेजोमयरूपी देवत्व जागृत अवस्थेत ठेवले जात असल्याने मूर्तीतील देवत्व सर्वस्वी काळाच्या परिभाषेतच कार्य करणारे असल्याने देवता नवसाला, म्हणजेच भक्‍ताच्या प्रत्येक इच्छेला पावणार्‍या किंवा प्रत्येक इच्छा पूर्णत्वास नेणार्‍या होत्या.

 

७. देवीने एक वर्षापूर्वीच सूक्ष्म-परीक्षण करण्यासंबंधी उन्हाच्या कवडशाच्या रूपातच आशीर्वाद देऊन पूर्वसूचना दिल्याचे जाणवणे

सूक्ष्म-परीक्षण करतांना मला एक वर्षापूर्वी प.पू. भगवानदास महाराज सनातनच्या आश्रमात आलेले असतांना आलेल्या अनुभूतीची जाणीव झाली. कोल्हापूर येथील शक्‍ती-उपासक प.पू. भगवानदास महाराज हे नामजपाला बसले असतांना, चैतन्याचा लाभ होण्यासाठी मी त्यांच्या समोर आध्यात्मिक उपायांसाठी बसले होते. त्यावेळी मी श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळात गेले आहे, असे मला जाणवले आणि माझ्या देहावरून तिच्या मूर्तीतून येणारा उन्हाचा कवडसा आशीर्वादाच्या रूपात फिरत आहे, असे जाणवले. त्याचा अर्थ आता मला उमगला; कारण आता मला सूक्ष्म-परीक्षण करावयाचे होते, तिच्या चरणांवर पडणार्‍या सूर्याच्या किरणरूपी कवडशाचेच. यावरूनच देवीने मला एक वर्षापूर्वीच या सूक्ष्म-परीक्षणासंबंधी पूर्वसूचना देऊन सूर्याच्या किरणरूपी कवडशाच्या रूपातच आशीर्वाद दिल्याचे जाणवून मन कृतज्ञतेने भरून आले.

 

८. पूर्वी देवळाच्या शिखरांमध्ये असलेले सूक्ष्म छिद्ररूपी झरोके हे वायूमंडलातील सूर्यमंडलाच्या कार्यकारी भावातून दावणार्‍या तेजोमय लहरींना त्या त्या वेळी स्वतःत घनीभूत करणारे असणे आणि त्या योगे काळाला पूरक अशाच पद्धतीने देवतांनी कार्य करणे

पूर्वीच्या काळी देवळाच्या शिखरांमध्ये असलेले सूक्ष्म छिद्ररूपी झरोके हे वायूमंडलातील सूर्यमंडलाच्या कार्यकारी भावातून दावणार्‍या तेजोमय लहरींशी संबंधित असून ते त्या त्या काळी काळाच्या भानातून भूमंडलाकडे येणार्‍या सूर्यलहरींना त्या त्या वेळी स्वतःत सामावून घेऊन मूर्तीमध्ये काळाला पूरक प्रमाणात कार्य करणार्‍या तेजलहरींना घनीभूत करणारे असे होते; म्हणून काळाला पूरक अशाच पद्धतीने देवता भूमंडलातूनच भक्‍तांच्या कल्याणासाठी कार्य करू शकत होत्या.

 

९. श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळात येणारे सूर्याचे किरण हे काळाला आवश्यक असणार्‍या आणि तारक-मारक अशा तत्त्वाने नटलेल्या देवीच्या शक्‍तीरूपी कार्याशी संबंधित असणे

श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळात येणारे सूर्याचे किरण हे काळाला आवश्यक असणार्‍या आणि तारक-मारक अशा तत्त्वाने नटलेल्या देवीच्या शक्‍तीरूपी कार्याशी संबंधित असून त्या काळी वायूमंडलाला शुद्ध ठेवण्यासाठी, म्हणजेच वायूमंडलातील रज-तमाचा प्रकोप दूर करण्यासाठी केलेली ही एक नैसर्गिक स्तरावरील उपाययोजनाच आहे.

 

१०. सूर्याचे ज्या वेळी दक्षिणायनात गमन होते, त्या काळाचा सूक्ष्मातून साक्षात्काररूपी अभ्यास करून त्याचा चैतन्याच्या स्तरावर लाभ मिळवण्यासाठी कसा उपयोग करून घेतला आहे, हेच किरणोत्सव प्रक्रियेतून लक्षात येणे

सूर्यमंडलात सूर्याचे या काळात ज्यावेळी उत्तरायणातून दक्षिणायनात गमन होते, त्या वेळी ते १७ अंशाच्या रूपांतरित प्रवासातून होते. या रूपांतरित प्रवासात सूर्यमंडलातून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेचा वेग हा आघातदायी असून तो सरळ भूमंडलाला भेदून भूमीत जडत्वदर्शकस्वरूपात घनीभूत होऊ शकतो. याच प्रक्रियेचा काळाच्या भानातून सूक्ष्मातून साक्षात्काररूपी अभ्यास करून त्याचा चैतन्याच्या स्तरावर लाभ मिळवण्यासाठी कसा उपयोग करून घेतला आहे, हेच किरणोत्सव प्रक्रियेतून लक्षात येते.

 

११. दुसर्‍या ठिकाणी घडलेली घटना साधिकेने आश्रमात राहून सांगणे

सायंकाळी ५.४८ वाजता हे सूर्याचे किरण वेगाने देवीच्या महाद्वारातून चरणांच्या ओढीने आत घुसत आहेत, असे जाणवले. (प्रत्यक्षात कोल्हापूरला चौकशी केली असता त्याच वेळी देवीच्या चरणांवर सूर्याचे किरण पडल्याचे समजले. साधिकेने गोव्यातून सूक्ष्म-परीक्षण करूनही तिला स्थुलातील ही गोष्ट अचूक समजली. यातूनच साधनेचे महत्त्व लक्षात येते – संकलक)

 

१२. सूक्ष्म-चित्र

 

१३. किरणोत्सवातील सूक्ष्म कार्यकारी प्रक्रियेचा स्थूल तेजोमय परिणाम म्हणून प्रत्यक्ष कार्यकारी किरणांचा आघातदायी स्पर्श देवीच्या चरणांना झाल्याचे जाणवणे आणि एक क्षण स्वतःच्या पावलांनाही गुदगुल्या झाल्याचे अनुभवास येणे

सूर्यमंडलातून दावणारा तेजोमय लहरींचा प्रकाशमयी झोत काळाचे भान धारण करून भूमंडलाकडे वेगाने आकर्षित होत होता. त्याच वेळी देवळाच्या बाह्य आवरणातून निघणारी शक्‍तीरूपी तत्त्वाची आकर्षणशक्‍तीयुक्‍त ऊर्जा काळरूपी विश्‍वाला आकाशमंडलात गवसणी घालण्यासाठी जातांना जाणवली. ज्या वेळी या स्थळदर्शक जडत्वधारी ऊर्जेचे काळरूपी सूर्यमंडलातील कार्यकारी तेजोमय ऊर्जेशी एका बिंदूत एकत्रिकरण झाले, त्या वेळी त्यांच्या घर्षणातून अनेक विस्फोटकारी तेजोमय नाद बाहेर पडले आणि या नादांनी वायूमंडलातील इच्छाशक्‍तीच्या स्तरावरील रज-तमरूपी आवरण भेदून ते त्या त्या स्तरावर नष्ट केले. त्यानंतर वायूमंडल अकस्मात शक्‍तीदायी ऊर्जेने भारित झाले, असे वाटू लागले. या सूक्ष्मातील प्रक्रियेनंतर त्याचा स्थूल तेजोमय परिणाम म्हणून प्रत्यक्ष कार्यकारी किरणांचा आघातदायी स्पर्श देवीच्या चरणांना झाल्याचे जाणवले आणि एक क्षण माझ्याही पावलांना गुदगुल्या झाल्याचे मी अनुभवले.

 

१४. सूर्यमंडलातून उत्तरायणातून दक्षिणायनात रूपांतरित होणारी ऊर्जा पहिल्या टप्प्यात आघातदायी, दुसर्‍या टप्प्यात प्रकाशदायी आणि तिसर्‍या टप्प्यात नाददायी असणे अन् या सर्वांचा एकत्रित परिणाम स्थुलातून मूर्तीच्या त्या त्या अवयवांवर पडणार्‍या किरणांच्या रूपात व्यक्‍त होण्यास अनुक्रमे तीन दिवस लागणे

सूर्यमंडलातून दावणारी आणि उत्तरायणातून दक्षिणायनात रूपांतारित होणारी सूर्यरूपी तेजस्वी किरणांच्या भाषेतील धारणा तीन टप्प्यांवर दक्षिणायनात रूपांतरित होते. पहिल्या टप्प्यात इच्छाशक्‍तीच्या स्तरावर तेजोमयऊर्जेचे वायूमंडलात ऊत्सारण होते, तर दुसर्‍या टप्प्यात क्रिया आणि तिसर्‍या टप्प्यात ज्ञानरूपी ऊर्जेच्या साहाय्याने तेजोमय ऊर्जेचे वायूमंडलात ऊत्सारण झाल्याने या सर्वांचे एकत्रित पडसाद वायूमंडलातील आकाशाच्या पार्श्वभूमीवर उमटतात; परंतु ही ऊर्जा पहिल्या टप्प्यात आघातदायी, तसेच दुसर्‍या टप्प्यात प्रकाशदायी आणि तिसर्‍या टप्प्यात नाददायी असल्याने या सर्वांचा एकत्रित परिणाम स्थुलातून मूर्तीच्या त्या त्या अवयवांवर पडणार्‍या किरणांच्या रूपात व्यक्‍त होण्यास अनुक्रमे तीन दिवस लागतात.

 

१५. आघातदायी ऊर्जा देवीच्या चरणांकडे विसावते, प्रकाशदायी ऊर्जा तिच्या छातीशी विसावते, तर नाददायी ऊर्जा तिच्या मस्तकावर मुकुटासारखी विराजमान होते. किरणोत्सवाचे हेच वैशिष्ट्य आहे

 

१६. किरणोत्सवातील तीन दिवसांत मूर्तीतील देवत्व पंचतत्त्वांच्या स्तरावर प्रकट होणे आणि त्यामुळे मूर्तीतील घनीभूत अशा शक्‍तीतत्त्वात्मक चैतन्याचा लाभ समष्टीला मिळणे

आघातदायी ऊर्जा देवीच्या भोवतीचे पृथ्वीदायी आणि आपदायी शक्‍तीतत्त्वात्मक आवरण जागृत करते, प्रकाशदायी ऊर्जा तिच्या भोवतीचे तेजदायी आवरण जागृत करते अन् नाददायी ऊर्जा समष्टीच्या कल्याणासाठी उपयोगी पडणारे तिच्या भोवतीचे वायू नि आकाशधारणात्मक आवरण जागृत करते. अशा प्रकारे या तीन दिवसांत मूर्तीतील देवत्व पंचतत्त्वांच्या स्तरावर प्रकट होऊन तिच्यातील घनीभूत अशा शक्‍तीतत्त्वात्मक चैतन्याचा लाभ समष्टीला मिळवून देते.

 

१७. इच्छाशक्‍तीशी संबंधित मूर्तीतील देवीतत्त्वाची जागृती शक्‍तीची अनुभूती देणारी असणे, क्रियेशी संबंधित देवीतत्त्वाची अनुभूती आनंददायी तर शांतीदायी अनुभूती ही ज्ञानाशी संबंधित असणे

इच्छाशक्‍तीशी संबंधित मूर्तीतील देवीतत्त्वाची जागृती शक्‍तीची अनुभूती देणारी असते, तर क्रियेशी संबंधित देवीतत्त्वाची अनुभूती आनंददायी असते. या वेळी मूर्तीच्या अनाहतचक्रातून आनंदाच्या लहरींचे ब्रह्मांडमंडलाकडे प्रक्षेपण होते, तर शांतीची अनुभूती देणारी, मस्तकावर विराजमान झालेली तेजदायी ऊर्जा ही ज्ञानमयी असते. ही ऊर्जा जिवाच्या मनात देवाविषयी निरपेक्षतेचा भाव जागृत करणारी असते.

 

१८. वायूमंडलात मोठ्या प्रमाणात रज-तमाचा प्रकोप वाढलेला असणे, देवळाच्या भोवतीच जवळजवळ आठ-दहा फूट काळ्या आवरणाचा जाड थर बनलेला असणे आणि तेजोमयी किरण भूमंडलात घुसतांनाच या रज-तमात्मक आवरणाशी युद्ध करत करत येत असल्याचे जाणवणे

देवीच्या चरणांशी पडलेले प्रकाशरूपी किरण हे धुक्यातील उन्हाचे किरण जसे अंधुक आणि विरळ दिसतील, तसे जाणवले. त्या वेळी जाणवले की, आता वायूमंडलात मोठ्या प्रमाणात रजतमाचा प्रकोप वाढल्याने देवळाच्या भोवतीच जवळजवळ आठ-दहा फूट असा काळ्या आवरणाचा जाड थर बनल्याने हे किरण भूमंडलात घुसतांनाच या रज-तमात्मक आवरणाशी युद्ध करत करत येत असल्याने त्यांच्यातील तत्त्वरूपी तेजस्वरूपी ऊर्जा जवळजवळ ७५ टक्के व्यय (खर्च) होते आणि उरलीसुरली ऊर्जा कशीबशी युद्ध करत चरणांशी येऊन पोहोचते. त्यामुळे काही प्रमाणातच या तेजोमय ऊर्जेने देवीतील देवत्व जागृत होते. त्यामुळे कधी कधी देवीच्या चरणांवर किंवा त्या त्या भागात स्वच्छ किरण पडलेले प्रत्यक्षात दिसतात किंवा कधी कधी दिसत नाहीत.

 

१९. पूर्वीच्या सात्त्विक पिढीपेक्षा आता सर्वत्र भ्रष्टाचार आणि रज-तमाचा फैलाव झाल्याने किरणोत्सवाच्या दर्शनापासून सर्व विश्‍वच वंचित होत चालल्याचे लक्षात येणे

१०-२० वर्षांपूर्वी जिवांच्या मनात थोड्याफार प्रमाणात देवीविषयीचा भाव टिकून होता. देवळाचे वायूमंडल शुद्ध असल्याने सूर्यमंडलातील किरणांचा देवीच्या चरणांशी लगेचच संयोग घडून येत असे; परंतु आता सर्वत्र भ्रष्टाचार आणि रज-तमाचा फैलाव झाल्याने किरणोत्सवाच्या दर्शनापासून सर्व विश्‍वच वंचित होत चालले आहे.

 

२०. मूर्तीतील देवत्वरूपी ऊर्जा जागृतीपासून वंचित रहाण्याला कलियुगातील मानवाचे अयोग्य आचरणच कारणीभूत असणे

कलियुगातील मानवाने आपल्या अयोग्य आचारातून संपूर्ण वायूमंडलालाच दूषित बनवल्याने आता सूर्यमंडलातील काळाच्या मापनाच्या प्रमाणात भूतलावर स्थळाचे भान घेऊन येणारे किरण देवीच्या चरणांपर्यंत थोड्या प्रमाणातच पोहोचत असल्याने मूर्तीतील देवत्वरूपी ऊर्जाही जागृतीपासून वंचित राहिल्याने संपूर्ण मानवजातच अद्भुत अशा कल्याणकारी चैतन्यदायी साक्षात्कारी अनुभवाला मुकली आहे.

 

२१. किरणोत्सवाचा सोहळा संपल्याची आतून जाणीव झाल्याने देवळाला मानस प्रदक्षिणा घालून देवीला नमस्कार करून तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्‍त करून परीक्षण थांबवले

 

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी (उपासनेमागील शास्त्र आणि उत्सव)’

Leave a Comment