देवतेच्या विडंबनात्मक, कलात्मक आणि सात्त्विक चित्रांचा यू.टी.एस्. उपकरणाद्वारे अभ्यास !

देवतेचे विडंबनात्मक चित्र, देवतेचे कलात्मक चित्र आणि स्पंदनशास्त्रानुसार सिद्ध केलेले सात्त्विक चित्र यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेची उपासना करतांना पूजकाच्या मनात त्या देवतेविषयी सतत भावजागृती होईल, असे तिचे रूप असणे महत्त्वाचे ठरते. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) अथवा त्रिमितीय रूप (मूर्ती) जितके त्या देवतेच्या मूळ रूपाशी जुळणारे असेल, तितके त्यात त्या देवतेचे तत्त्व अधिक आकृष्ट होते. हल्ली सर्वसाधारणतः देवतांची चित्रे वा मूर्ती बनवत असतांना सूक्ष्मातून देवतेची स्पंदने जाणून घेऊन त्यानुसार चित्र किंवा मूर्ती बनवण्यापेक्षा कल्पनाविष्कारावर अधिक भर दिला जातो.

देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालतेे. सध्या देवतांचे विविध प्रकारे विडंबन होते, उदा. हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढून ती जाहीर विक्रीसाठी ठेवली होती. व्यापारी हेतूने विज्ञापनांमध्ये देवतांचा मॉडेल म्हणून वापर केला जातो.

देवतेचे विडंबनात्मक चित्र, पेठेत (बाजारात) मिळणारे चित्र आणि स्पंदनशास्त्रानुसार सिद्ध केलेले चित्र यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

श्री लक्ष्मीदेवीचे विडंबनात्मक चित्र, पेठेत मिळणारे सर्वसाधारण चित्र आणि परात्पर गुरु आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधक-चित्रकाराने सिद्ध केलेले चित्र यांचे यू.टी.एस्. उपकरणाने परीक्षण करण्यात आले.या सर्व परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी रेखाटलेले श्री लक्ष्मीदेवीचे विडंबनात्मक चित्र
हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी रेखाटलेले श्री लक्ष्मीदेवीचे विडंबनात्मक चित्र
पेठेत (बाजारात) मिळणारे श्री लक्ष्मीदेवीचे सर्वसाधारण चित्र
पेठेत (बाजारात) मिळणारे श्री लक्ष्मीदेवीचे सर्वसाधारण चित्र
सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे सात्त्विक चित्र
सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे सात्त्विक चित्र

 

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. श्री लक्ष्मीदेवीचे विडंबनात्मक चित्र

देवतांचे हेतुपुरस्सर विडंबन करून अनादर करणे, या उद्देशाने हे चित्र रेखाटलेले असते. त्यामुळे या चित्राकडे पाहू नये, असे वाटते, तसेच अशी विडंबनात्मक चित्रे संबंधित कलाकाराची विकृत मानसिकता दर्शवते.

२ आ. पेठेत मिळणारे श्री लक्ष्मीदेवीचे चित्र

बहुतांश चित्रकार केवळ धन-प्रसिद्धी मिळवणे अथवा कलेसाठी कला या उद्देशाने चित्रे रेखाटतात. त्यामुळे ही चित्रे आध्यात्मिकदृष्ट्या फारशी लाभदायी नसतात.

२ इ. साधक-चित्रकाराने सिद्ध केलेले श्री लक्ष्मीदेवीचे सात्त्विक चित्र

हे चित्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्पंदनशास्त्रानुसार साधक-चित्रकाराने ईश्‍वरप्राप्तीसाठी कला म्हणजेच साधना या भावाने रेखाटलेे आहे. त्यामुळे हे चित्र सात्त्विक झाले असून त्यात २८.५ टक्के (टीप १) देवतातत्त्व आले आहे. पूजकाला भावजागृतीच्या दृष्टीने ते लाभदायी सिद्ध होते, तसेच देवतेप्रती भाव असणार्‍या जिवांना अनुभूतीही येऊ शकतात.

टीप १ : कलियुगात एखाद्या चित्रात अधिकाधिक ३० टक्के देवतातत्त्व येऊ शकते. अध्यात्मशास्त्रानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून सात्त्विक अन् त्या त्या देवतेचे जास्तीत जास्त तत्त्व आकृष्ट करून घेऊ शकेल, अशा चित्रांची, तसेच मूर्तींची निर्मिती करण्यात येते. वरील तत्त्वानुसार तारक रूपातील श्री लक्ष्मीचे सात्त्विक चित्र सनातनच्या साधक-चित्रकारांनी बनवले आहे. शिव, गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण, मारुति आणि दत्त या देवतांचीही ती ती तत्त्वे अधिकाधिक आकृष्ट करणारी सात्त्विक चित्रे बनवली आहेत.

 

३. यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

३ अ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख

scan_prayog-200x270

या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

३ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

३ आ १. नकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड)

यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट)

यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.

३ आ २. सकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

३ आ ३. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे

प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.

३ इ. यू.टी.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत

चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) यू.टी.एस् या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ४ आ ३ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी यू.टी.एस् या स्कॅनरमध्ये प्रथम इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ त्या वस्तूभोवती इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ नाही, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

 

४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

 

५. यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे ९.९.२०१६ या दिवशी केलेली निरीक्षणे

टीप २ : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

५ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील विवेचन

५ अ १. श्री लक्ष्मीदेवीच्या विडंबनात्मक चित्राचे परीक्षण केले असता तेथे पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे

श्री लक्ष्मीदेवीच्या विडंबनात्मक चित्राचे परीक्षण करत असतांना इन्फ्रारेड स्कॅनरने केलेला कोन १८० अंश आणि अल्ट्राव्हायोलेट स्कॅनरने केलेला कोन सुद्धा १८० अंश होता; म्हणजेच तेथे पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळली. परंतु पोझिटिव्ह स्कॅनर (सकारात्मक ऊर्जा) मात्र अजिबात उघडला नाही. नमुना वापरून परीक्षण केले तेव्हा पुन्हा स्कॅनर १८० अंश कोनात उघडला, तसेच चित्राभोवती त्रासदायक स्पंदने १.४१ मीटरपर्यंतच्या क्षेत्रात प्रक्षेपित होत होती. यांतून अशी चित्रे रेखाटणे अन् ती वापरणे अतिशय हानिकारक असल्याचे सहज लक्षात येईल.

५ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील विवेचन

५ आ १. पेठेतील श्री लक्ष्मीदेवीच्या चित्राचे परीक्षण केले असता तेथे अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळणे

पेठेतील (बाजारातील) श्री लक्ष्मीदेवीच्या चित्राचे परीक्षण केले असता तेथे नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. पोझिटिव्ह स्कॅनर (सकारात्मक ऊर्जा) ९० अंश कोनात उघडला, म्हणजे तेथे काही प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. चित्राची प्रत वापरून परीक्षण केले, तेव्हा प्रभावळ १.५२ मीटर होती, म्हणजे अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत; परंतु हे चित्र पूजकाला आध्यात्मिकदृष्ट्या फारसे लाभदायी नाही.

५ आ २. सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या सात्त्विक चित्रातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होणे

साधक-चित्रकाराने साधना म्हणून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली रेखाटलेल्या चित्राचे परिक्षण करतांना पोझिटिव्ह स्कॅनर १८० अंश कोनात उघडला आणि त्याची प्रभावळ २.५६ मीटर, म्हणजे पेठेतील चित्राच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे, तसेच चित्राची प्रत वापरून परीक्षण केले, तेव्हा प्रभावळ ४.६१ मीटर म्हणजे पुष्कळ अधिक वाढली. यांतून चित्रात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने असून पूजकाला आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभदायी आहे, हे सहज लक्षात येईल.

 

६. निष्कर्ष

देवतेचे तत्त्व चित्रामध्ये जितके अधिक, तितकी पूजकामध्ये भावजागृती आपोआपच अधिक होते. याचा त्याला ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही दृष्टीकोनांतून लाभ होतो. यास्तव देवतेचे तत्त्व जास्तीत जास्त आकृष्ट करून घेऊ शकेल, अशा चित्राची वा मूर्तीची निर्मिती होणे आवश्यक ठरते. याउलट विकृत मानसिकेच्या आहारी जाऊन देवतांचा अनादर करण्याच्या उद्देशाने जेव्हा एखादा कलाकार चित्र अथवा मूर्ती सिद्ध करतो, तेव्हा त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे कलाकार आणि समाज या सर्वांची हानी होते, तसेच देवतेचा अनादर झाल्याने पापही लागते.

साधक-कलाकारांचा आदर्श समोर ठेवून कलेसाठी कला नव्हे,तर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, याचे अनुकरण करून आपली कला ईश्‍वरचरणी अर्पण करण्याची सद्बुद्धी सर्व कलाकारांना होवो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (११.९.२०१६)
ई-मेल : [email protected]

 

कलेचे सात्त्विक सादरीकरण होण्यासाठी
संशोधन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांच्या शिक्षणाचे बीजारोपण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : साधनेच्या संदर्भात व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग, या सिद्धांताला अनुसरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची विद्या ग्रहण करण्याची क्षमता आणि कलेची आवड यांनुसार त्यांना साधना शिकवली. आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, हे ध्येय ठेवून अनेक साधक चित्रकला, मूर्तीकला, संगीत, नृत्यकला आदी कलांच्या माध्यमांतून साधना करत आहेत. पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापन केलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण देण्यात येणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलांमध्ये पारंगत साधक-कलाकार त्यांच्या कलेचे सात्त्विक सादरीकरण होण्याविषयी संशोधन करत आहेत.

वाचकांना विनंती : या लेखातील श्री लक्ष्मीदेवीचे विडंबनात्मक चित्र, पेठेत मिळणारे सर्वसाधारण चित्र आणि सनातन-निर्मित सात्त्विक चित्र यांच्यासंदर्भातील लिखाण केवळ अध्यात्मशास्त्रदृष्ट्या तुलनात्मक अभ्यासाच्या हेतूने प्रसिद्ध केले आहे. त्यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. विडंबनात्मक चित्र छापण्यामागे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून हिंदूंना विडंबन कळावे, हा उद्देश आहे ! – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात