विविध देवतांचे कार्य आणि वैशिष्ट्ये

कु. मधुरा भोसले

खालील लेखात विविध प्रकारच्या देवता आणि त्यांचे कार्य यांविषयी माहिती दिली आहे. ही माहिती वाचून प्रत्येक देवतांचे कार्य हे वेगळे कसे असते, त्यांच्या मर्यादा आणि या शक्ती कोणत्या अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म-युद्ध करून लढतात, याविषयी सारणी दिली आहे. यावरून वास्तुदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता आणि उच्चदेवता यांचे मनुष्याच्या जिवनातील महत्त्व आपल्या लक्षात येईल.

धर्माच्या अभ्यासकांना विनंती !

सनातन प्रभातमध्ये प्रकाशित होणारे साधकांना मिळणारे नाविन्यपूर्ण ज्ञान योग्य कि अयोग्य, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, यांचा अभ्यास करण्याच्या संदर्भात साहाय्य करा !

आतापर्यंतच्या युगायुगांतील धर्मग्रंथांत उपलब्ध नसलेले नाविन्यपूर्ण ज्ञान ईश्‍वराच्या कृपेने सनातनच्या काही साधकांना मिळत आहे. ते ज्ञान नवीन असल्यामुळे जुन्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन त्या ज्ञानाला योग्य कि अयोग्य ?, असे म्हणता येत नाही. ते ज्ञान योग्य कि अयोग्य ?, यासंदर्भात, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूतींच्या संदर्भात (उदा. उच्च लोक, पंचमहाभूते यांच्याविषयीच्या अनुभूतींच्या संदर्भात) धर्माच्या अभ्यासकांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास मानवजातीला नवीन योग्य ज्ञानाचा लाभ होईल. एवढेच नव्हे, तर अयोग्य काय ?, हेही कळेल. यासाठी आम्ही धर्माच्या अभ्यासकांना यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.- संपादक, सनातन प्रभात

Leave a Comment