नृसिंह जयंतीचे अध्यात्म !

ज्या वेळी पृथ्वीवर अधर्म माजतो आणि साधू-सज्जनांचा त्रास पराकोटीला जातो, त्या वेळी ईश्‍वरी तत्त्व मानवी अवतार धारण करून पुन्हा धर्माची स्थापना करत असते. उन्मत्त वरदानाने माजलेल्या हिरण्यकश्यपूला त्याच्याच वरदानाचे तंत्र वापरून धड मानव नाही आणि धड पशूही नाही, अशा चमत्कारिक आवेशातून प्रकट होऊन दानवांच्या शक्तीपेक्षा ईश्‍वरीतत्त्वाची शक्ती प्रचंड असते. याची ओळखही नृसिंह अवताराने जगाला करून दिलेली आहे. नृसिंह अवतार भगवान विष्णूंचा चौथा अवतार असून तो सत्ययुगातील आहे.

नृसिंह हे अत्यंत शक्तीशाली आणि उग्र दैवत आहे. त्या अवताराची प्रकटशक्ती ४५ टक्के, तर त्यातील विष्णूतत्त्वाचा अंश ४५ टक्के आहे. उर्वरित शक्ती देवीतत्त्वाची असते. नृसिंह मूर्तीमधील शक्ती सामान्यांना पेलवत नसल्याचे नृसिंहाच्या देवळातून मूर्तीच्या डोळ्यांवर कापड बांधून ठेवलेले असते.

श्री महाविष्णूच हिरण्यकश्यपूच्या वधासाठी ज्या लाकडी खांबातून प्रकटले, तो खांब आैंदुबर वृक्षाचा होता. कालांतराने या दुभंगलेल्या खांबाला पालवी फुटून त्याचा औदुंबर वृक्ष झाला. याच झाडाखाली भक्त प्रल्हादाला दत्तप्रभूंचे दर्शन झाले. औैदुंबर वृक्षाने दत्तप्रभूंकडे वर मागितला. त्यांना वृक्षाला वरदान दिले की, तुझ्या मुळाशी मी सतत वास्तव्य करीन आणि माझा पुढील अवतार नृसिंह सरस्वती या नावानेच होईल ! – श्री. श्रीकांत भट, अकोला

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात