जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! सनातन संस्था विश्वशांतीचे कार्य करत आहे. सनातनचे साधक भाग्यवान आहेत की, त्यांना प.पू. डॉ. आठवले यांच्यासारखे सद्गुरु लाभले आहेत. या आश्रमात साधक सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वत:चे मूल्यांकन करत आहेत. – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी