नाशिक कुंभमेळा – २०२७
नाशिक – आश्विन कृष्ण पंचमी, म्हणजे ३० ऑक्टोबर या दिवशी सकाळी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभपर्वाचे प्रतिनिधित्व करणार्या धर्मध्वजाचे संत-महंत यांच्या मंगलहस्ते पूजन झाले. ध्वजपूजनाच्या वेळी गणेशपूजन, पुण्याहवाचन, तसेच कलशपूजन हे विधी पार पडले. धर्मध्वजाचे पूजन झाल्यानंतर दुपारी ३.३० वाजता तपोवन येथील मोदी मैदानातून नगरप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. सनातन हिंदु धर्माचा घोष आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करत विविध चित्ररथ यांसह भगवे ध्वज हातात धरलेल्या ४० सहस्रांहून अधिक भाविकांनी नगरप्रदक्षिणेत सहभाग घेतला.

नगरप्रदक्षिणेला संत आणि मान्यवर यांची उपस्थिती !
नगरप्रदक्षिणेत १२६ पथके सहभागी झाली होती. जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, अयोध्या येथील हनुमानगढीचे धर्मसम्राट ज्ञानदासजी महाराज, टिलाद्वारा गाद्याचार्य मंगलपीठाधीश्वर श्री श्री १००८ माधवाचार्यजी महाराज, कुंभपर्व सोहळ्याचे मंत्री गिरीश महाजन, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. यांसह वैष्णव संप्रदायाच्या श्री पंच दिगंबर, श्री पंच निर्मोही आणि श्री पंच निर्वाणी या ३ आखाड्यांचे प्रमुख, तसेच वल्लभाचार्य नगरप्रदक्षिणेमध्ये सहभागी झाले होते.
1/
🚩40,000+ Devotees, Saffron Flags & Chants of Sanatan Hindu Dharma!
Nashik witnessed a grand Nagar Pradakshina of the Dharma Dhwaj representing the Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela on October 30. Saints & Mahants ceremonially worshipped the Dhwaj before the procession began. https://t.co/3HQWQSYUFs
— Sanatan Prabhat (Kannada) (@Sanatan_Prabhat) October 31, 2026
वंदनीय उपस्थिती !
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रवींद्र पुरीजी महाराज, श्री महंत राजेंद्रदासजी महाराज, राष्ट्रीय प्रवक्ते महंत संजयदासजी महाराज, श्री महंत मुरलीदासजी महाराज, श्री महंत वैष्णवदासजी महाराज, श्री महंत माधवदासजी महाराज, श्री महंत मोहनदासजी महाराज, महंत भक्तीचरणदासजी महाराज, महंत रामस्नेही महाराज, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हेही धर्मध्वज शोभायात्रेत सहभागी झाले होते.

नाशिक सिंहस्थ कुंभपर्वाचा भव्य शंखनाद | ४० हजार संत-महंत आणि भाविक
…अशी होती शोभायात्रा !

नगरप्रदक्षिणा करतांना धर्मध्वज रथामध्ये ठेवण्यात आला होता. त्या रथात गोदावरीचे जल असलेल्या कलशासही विशेष स्थान होते. संत आणि आखाडे यांचे प्रमुख रथामध्ये विराजमान झाले होते. प्रदक्षिणेत सहभागी झालेले विविध साधू-संतांचे रथ फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आले होते. मोदी मैदानातून प्रारंभ झाल्यावर पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, दहीपूल मुख्य रस्ता, रविवार कारंजा, चांदीचा गणपती, व्हिक्टोरीया पूल आणि मालेगाव स्टँड अशा मार्गावरून शोभायात्रा पुढे गेली.
५ सहस्रांहून अधिक पोलिसांचा पहारा !
शोभायात्रेच्या ठिकाणी ५ सहस्रांहून अधिक पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता. नाशिक पोलिसांसह मुंबई, ठाणे, सोलापूर आदी विविध जिल्ह्यांतील पोलीस नाशिक येथे आले आहेत.
नगरप्रदक्षिणेत ‘श्री’ संप्रदायाचा विशेष सहभाग !

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या ‘श्री’ संप्रदायाचे सहस्रो साधक नगरप्रदक्षिणेत सहभागी झाले होते. संप्रदायाच्या वतीने अध्यात्म, सामाजिक जागृती आदी विविध विषयांचे चित्ररथ सिद्ध करण्यात आले होते. जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा रथही नगरप्रदक्षिणेत होता. स्त्रियांनी मस्तकावर तुळशी वृंदावन धारण केले होते. यात आदिवासी कलांचे सादरीकरण करणारे पथकही होते. संप्रदायाने विविध ठिकाणी रुग्णवाहिकाही ठेवल्या होत्या.


या वेळी सनातन संस्थेकडूनही नगरप्रदक्षिणेचे स्वागत करण्यात आले. सनातनच्या साधकांनी संत-महंत, तसेच सहस्रो भक्त यांचे स्वागत करणारे फलक हाती धरले होते.
नाशिक येथील पुरोहित संघाने केले होते आयोजन !
नाशिक येथील पुरोहित संघाने या नगरप्रदक्षिणेचे आयोजन केले होते. त्याला साधू-संत आणि संप्रदाय यांचा चांगला प्रतिसाद लाभला, असे पुरोहित संघ, नाशिकचे श्री. सतीश शुक्ल यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले.
महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा महाकुंभ...
महाकुंभ मेळ्यात सनातन संस्थेच्या ‘फिरत्या वितरण कक्षां’द्वारे भाविकांमध्ये धर्मप्रचार !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र...
हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु संस्कृती अन् धमार्र्चरण यांची आवश्यकता समाजाला पटवून देत...